प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

‘कागदावर सत्य मांडण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करत आलो आणि त्यासाठी माझी निष्ठा ही रेषांशी  आहे..’ साउल स्टाईनबर्ग यांच्या या एका वाक्यातच त्यांच्या जीवनाचं सार आपल्याला कळतं. त्यांची बरीचशी चित्रं ही रूढार्थाने व्यंगचित्रं आहेत. ती तशी आहेतच, पण निश्चितपणे ती काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असं वाटतं. ही चित्रं अत्यंत निष्ठूरपणे सत्य सांगत आहेत असं वाटतं.  निष्ठूरपणे अशासाठी- कारण रेषांचा कमीत कमी वापर स्टाईनबर्ग करतात. पेन, शाई आणि कागद ही त्यांची सामग्री आहे. तेवढीच त्यांना पुरते. कारण ते फक्त एक बारीक, नाजूक, सलग रेषा काढतात. तीसुद्धा किंचित ओबडधोबड. कच्चं रेखाटन वाटावं असं! पण ते जे सांगतात ते क्षणभर गमतीशीर वाटतं, पण नंतर बराच काळ त्यातलं मर्म समजून घेण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणजे ती बारीक, नाजूक, ओबडधोबड रेषा आपण विसरू शकत नाही. त्यांची बरीचशी चित्रं शब्दविरहित आहेत. फक्त रेषांचीच भाषा! त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्यातून वेगवेगळा अर्थ काढण्याची मुभा आहे, संधी आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या क्षमतेने, कुवतीप्रमाणे ते करत राहतो.

Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
Success Story Of Manmohan Singh Rathore
Success Story Of Manmohan Singh Rathore: आईसाठी सोडली सैन्याची नोकरी, एका सहलीने बदललं आयुष्य; वाचा मनमोहन सिंग राठोड यांची परिश्रम अन् समर्पणाची गोष्ट

एक उदाहरण म्हणून आपण या चालणाऱ्या माणसाच्या चित्राचा विचार करू. पाहताक्षणी आपल्याला त्यातील चमत्कृतीमुळे गंमत वाटते. पण नंतर वाटतं की, हे त्याचं सिंहावलोकन आहे का? की सतत भूतकाळात रमण्याची सवय? पुढे चालताना एखादा खड्डा समोर आला तर तो नक्की त्यात पडेल! मग या अनुभवाचा काय फायदा? आणि हा खड्डा त्याला आणखी पुढे गेल्यावरच मागे पाहताना दिसेल. पण मग त्याचा काय उपयोग? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आणि मग आपण आपल्या आयुष्यातल्या काही घटनांशी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. परिणामी साउल स्टाईनबर्ग यांच्या रेषेत आपण गुरफटून जातो. त्या अर्थाने मग साउल स्टाईनबर्ग हे तत्त्ववेत्ते किंवा विचारवंत वाटू लागतात. शब्दांचा किंवा रेषांचा फाफटपसारा त्यांच्या चित्रांत नसतो. असतो तो फक्त सत्याची खोलवर जाणीव करून देणारा एक विचार. विसाव्या शतकातल्या आपल्या सगळ्या संस्कृतींचे, संकल्पनांचे खोटे मुखवटे त्यांनी खरवडून काढले आहेत. हे काम त्यांनी तब्बल साठ र्वष केलं.

स्टाईनबर्ग यांचा जन्म रुमानियामध्ये झाला. (१९१४-१९९९) त्यांच्या वडिलांचा डिझाइनचे खोके बनवण्याचा व्यवसाय होता. तिथून त्यांना एकूणच डिझाइनविषयी आकर्षण निर्माण झालं. पुढे फाइन आर्ट्स, कमर्शियल आर्ट्स वगैरेचं शिक्षण त्यांनी घेतलं. पण रुमानियातील एकूण वंशवादाचं वातावरण त्यांच्या फारच जिव्हारी लागलं. हुकूमशाही राजवटीमध्ये जे होऊ शकतं ते त्यांच्याबाबतीत सतत होत राहिलं. पुढे मिलानमधून त्यांनी आर्किटेक्चरची पदवी घेतली.

कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी एका विनोदी साप्ताहिकासाठी कार्टून्स काढली आणि ती प्रचंड लोकप्रिय झाली. पण हुकूमशाही राजवटीमुळे त्यांची घुसमट व्हायला लागली. त्यांना सहा  आठवडय़ांचा बंदिवासही भोगावा लागला. काम करण्यावर बंधने येऊ लागली. साहजिकच स्टाईनबर्ग इतर देशांचा आसरा शोधू लागले. शेवटी १९४२ मध्ये त्यांना अमेरिकन व्हिसा  मिळाला. आणि लगेचच अमेरिकन नागरिकत्वही. त्यानंतर मुख्य म्हणजे अमेरिकन नौदलात नोकरीही मिळाली. पुढे त्यांनी त्यामार्फत भारत, चीन, उत्तर आफ्रिका वगैरे देशांत प्रवास केला आणि त्यादरम्यान भरपूर रेखाचित्रं काढली. ती चित्रं पाहताना मजा येते. विशेषत: त्या काळात त्यांना भारत कसा दिसला हे पाहणं आपल्याला आज मजेदार वाटतं.

सुरुवातीच्या काळात एखादं मजेशीर चित्र आणि त्याखाली खुशखुशीत वाक्य अशी त्यांची व्यंगचित्रं प्रसिद्ध व्हायची. पण नंतर मात्र त्यांनी त्यापासून फारकत घेतली आणि निव्वळ नि:शब्द चित्रांकडे ते वळले. म्हणजे लेखी कॉमेंट नाहीच; फक्त दृश्यभाष्य!

स्टाईनबर्ग म्हणतात की, व्यंगचित्रकाराचा  पेशा हा खूपच कठीण आहे, कारण तुम्हीच तुमच्या चित्राचे संपादक असता आणि साहजिकच चित्रातला अनावश्यक तपशील तुम्हालाच कमी करावा लागतो. ‘न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकात त्यांनी तब्बल साठ र्वष व्यंगचित्रं काढली, यावरून त्यांचा आवाका लक्षात येईल.

खाकी कागदी पिशव्यांपासून त्यांनी मुखवटे तयार केले. त्यावर वेगवेगळे चेहरे रेखाटून, ते घालून त्यांनी ग्रुप फोटो काढले. मानवाचा मूळ  चेहरा वेगवेगळ्या मेकअपमुळे, भावनांमुळे पूर्ण बदललेला आहे हे त्यांना सिद्ध करायचं होतं.

‘दि पासपोर्ट’, ‘दि आर्ट ऑफ लिविंग’, ‘ऑल इन लाइन’ असे त्यांचे काही संग्रह उपलब्ध आहेत. त्यांच्या नावाचे फाऊंडेशनही आहे.

स्टाईनबर्ग यांनी आयुष्यभर असंख्य प्रयोग केले. फोटोवर चित्रं काढली. टेक्स्टाईलसाठी डिझाइन करून दिलं. कोलाज केली. हॉटेलसाठी म्युरल्स केली. अनेक देशांत चित्रांची प्रदर्शनं भरवली. इतकंच नव्हे तर काही जाहिरातींसाठीही त्यांनी चित्रं काढली. अर्थात हे सर्व करत असताना त्यांनी स्वत:ची शैली, रेषा आणि विचार सोडला नाही. भरभर धावणारी आणि मागे काहीतरी सोडून जाणारी स्टाईनबर्ग यांची अत्यंत बारीक रेषा आपल्या मनावर ठसा उमटवते. एखादं तत्त्वज्ञान रुतून बसावं, तशी!