ऐतिहासिक वाडे हा महाराष्ट्रातील एक उपेक्षित वारसा आहे. त्यामुळे या वाडय़ांची ओळख करून घेणे, हा इतिहास जाणून घेण्याचा एक मार्ग होऊ शकतो. प्रस्तुत पुस्तक त्यादृष्टीने उपयुक्त आहे. प्रत्येक वाडय़ाविषयी लिहिताना त्यात वावरलेल्या व्यक्ती, तिथे घडलेल्या महत्त्वाच्या घटना यांची माहिती होते, तशीच या वाडय़ांची रचना, त्यातला कलात्मकपणा याचीही माहिती मिळते. पुरंदरे वाडा, पानिपतकार शिंदे यांचा वाडा, सरदार होळकरांचा वाडा, पंतप्रतिनिधींचा वाडा, हुतात्मा राजगुरू यांचा वाडा, राजे घोरपडे यांची गढी, सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांचा वाडा अशा एकंदर पन्नास वाडय़ांची या पुस्तकात माहिती आहे. वाडय़ांची रेखाचित्रं दिल्याने पुस्तक वाचनीय   झाले आहे.
‘महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे’ – डॉ. सदाशिव स. शिवदे, स्नेहल प्रकाशन, पुणे, पृष्ठे- २९५, मूल्य- ३२५ रुपये.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा