न्याय-समतेच्या समाजासाठी ‘शेकडो समाज रचना निर्माण करा, पण माणसात बुद्धदेवांचं प्रेम आणि सहृदयता येत नाही तोपर्यंत ते सारं काही निरर्थक आहे,’ असे स्वामी विवेकानंद सांगतात. धर्म कशासाठी? ‘मी-माझं’ कमी होईल तेवढीच ही सहृदयता वाढणार, पण अस्मितेतील ‘मी’ धर्मावरच स्वार होतो, हे स्वामीजींचे विचार. शेकडो वर्षांत अंत:करण-विकासात धर्मांना तरी किती यश लाभलं हाही प्रश्न आहेच. ‘प्रदीर्घ परधर्मीय परदास्यानंतरही हिंदू जाती जिवंत आहे ती सहिष्णुतेमुळेच’ या स्वामीजींच्या विश्वासाला आज अनेक हिंदू प्रश्नांकित करीत आहेत. त्याचे स्वागतच, पण म्हणूनच ही वेळ आहे इतिहासातून अर्थ काढण्याची, धर्मतत्त्वे आणि आचरणातील फरक स्वीकारण्याची; तसेच अस्मितेपोटी धर्माला सत्ताकारणाला जुंपलं की धर्माच्या आत्म्याचं काय होतं हेही शिकण्याची! थोडक्यात माणूस/ समाज पुढं कशानं जातो? कट्टरता/ प्रतिकट्टरता की सहिष्णुता यावर तटस्थ विचार करण्याची!

शक्तिमान झाल्यावर पोपनी किमान अर्धा डझन तरी रोमन सम्राटांना धर्म-बहिष्कृत केलं, तर सम्राटांनी त्या पोपना पदावरूनच काढून टाकलं. धर्म-मतभेदासाठी जाळलेले ‘ब्रूनो’ज्, क्रुसेडस् , दोन महायुद्धे, अणुबॉम्बचा वापर, कॅथलिक/ प्रॉटेस्टंट संघर्ष, साम्राज्यवाद… किती रक्त सांडलं? हा का होता प्रभू येशूंचा संदेश? प्रेषितांनंतर खलिफा (धर्म-राजसत्ता एकत्रित) कोणी व्हायचं यावरून झालेल्या शिया-सुन्नी पंथांतील इतिहासातील संघर्ष सोडा- आजही त्याचं दर्शन देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय राजकारणातही घडतं. अर्धा डझन वेळा तरी दोन मुस्लीम राजे एकाच वेळी आपण खलिफा असल्याचा दावा करीत होते. (शंकराचार्यांनाही बिचारे बनवणारी ‘कळसा’पूर्वीचीच ‘प्राणप्रतिष्ठा’ ही आपली कुठं सुरुवात!) प्रेषितांच्या मृत्यूच्या केवळ तीस वर्षांत चौथ्या खलिफांचा (अली तालीब ) मशिदीत नमाज पढतानाच खून झाला. अगदी ८०च्या दशकातही दहा वर्षं इराण-इराक युद्धांत काही लाख प्राण गेले. (प्रभू येशूंच्याच) अमेरिका/ पश्चिमेचं साम्राज्यवादी सत्ताकारण गाझा/ पॅलेस्टाईनची स्वभूमीतच शंभरएक वर्षं अमानुष ससेहोलपट करीत आहे, पण ‘उम्मा’ची (जागतिक मुस्लीम ऐक्य : धर्माचं महत्त्वाचं अंग) पन्नासएक राष्ट्रं काय करताना दिसली? ‘इस्लामिक’ अणुबॉम्ब बनवणाऱ्या पाकिस्तानची काय अवस्था आहे? अनेक मस्लीम राष्ट्रं यादवी युद्धात का गुंतलेली आहेत? याबरोबरच असंख्य कट्टरतावादी संघटना, ब्लासफेमी/ अॅपॉस्टसी (धर्म सोडायला बंदी) इत्यादींमुळेही मध्ययुगीन अंधारात सामाजिक समतेचा प्रकाश-दीप लावणाऱ्या इस्लामची जगात आज काय अवस्था व प्रतिमा आहे? कुणी केलंय आत्मपरिक्षण? काफर-हनन करणाऱ्या अल्लाउद्दिनच्या तलवारीचं अमीर खुस्राोंचं कौतुक तेराव्या शतकातलं; पण ‘मूर्तिपूजकत्व’ आणि (अकबराचा थोडा उदार) ‘दिने इलाही’ या विरुद्ध लढण्यामुळं औरंगजेबांची प्रेषित अब्राहमशी तुलना (मोह. इक्बाल) ही तर विसाव्या शतकातली!

Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
sarpanch santosh deshmukh, santosh deshmukh,
बीडचे धडे!
amaltash movie
सरले सारे तरीही…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’

आणखी वाचा-क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर

थोडक्यात सर्वांचीच धर्मतत्त्वे ग्रंथांत राहतात (‘समं सर्वेषु भूतेषु…’ आणि अस्पृश्यता!). मात्र प्रत्येक धर्मसमूहानं एखाद्दुसऱ्या जीवनांगात मोठा सद्गुण विकास केला आहे, तर इतरत्र तो खूप मागे राहिला. या धर्म-प्रवासात व्यक्ती तसेच समूह वेगवेगळ्या जीवनांगात वेगवेगळ्या टप्प्यांवर मागेपुढे असतात आणि सर्वांची सर्वांना जरुरी आहे.

मागच्या प्रश्नाकडे जाऊया. कालचा (सहिष्णुतेमुळे) शेकडो वर्षांच्या गुलामीतील ‘जित’ भारत आज विज्ञान/ तंत्रज्ञानाधारित आधुनिकतेच्या अटळ शर्यतीत समर्थपणे भागीदारी करताना (१४ च्या फार पूर्वीपासूनच!! ) का दिसत आहे? ज्ञानार्जनाला आवश्यक सहिष्णूवृत्ती. त्यात इतिहासातील सूडांना स्थान कुठून? वर्तमानातील अन्याय परिमार्जन? जरूर : ‘युध्यस्व’! पण कसं? ‘विगतज्वर:’, ‘द्वेष’ज्वर-रहित (गीता : ३.३०)! भर राजसभेत वहिनीचं वस्त्रहरण करणाऱ्या दुर्योधनाचं पारिपत्य जरूर, पण त्याच्याविषयी भगवद्गीतेत एक तरी द्वेष-शब्द आहे का? एवढं महायुद्ध होऊनही वृद्धपणी धृतराष्ट्र-गांधारीच्या वनप्रस्थानात बरोबर कोण? पांडवांची माता कुंती! ही भावुकता नव्हे; प्रचंड विविधता असलेला हा खंडप्राय देश एक असण्याचा आणि हिंदू धर्माचा मौलिक आधार तोच आहे : ‘ईशावास्यमिदं सर्वं’ आणि त्यातूनच ‘एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति…!’ मंदिरं तोडली त्यांच्यासाठी आम्ही मशिदी बांधू… ‘ही स्वामिजींची भावुकता नाहिये; ‘ईशावास्यं…’मधील मानवी ऐक्याची ही ‘विश्वधर्म’दृष्टी आहे. जगात कोणतंही समूहमन अशा उंचीला पोहोचू शकलेलं नाही; पण ‘योग्य आदर्श असले तरी आपणा सामान्यांकडून जर एक हजार चुका होतील तर अयोग्य आदर्शांमुळे मात्र दहा हजार!’असे स्वामी विवेकानंद मानत. जगही त्यासाठी कोणाकडे पाहतं? ‘भारतानं जपली नाही तर जगातील आध्यात्मिकताच नष्ट होईल’हे विधान आहे इतिहास तत्त्वज्ञ अॅरनॉल्ड टॉयन्बी यांचे. थोडक्यात हे सारं आपल्या ‘डीएनए’त उतरलं असेल तर त्यापुढे अस्मिताग्रस्त प्रतिक्रिया विरून जाईल हीच शक्यता.

जगभराच्या इतिहासातील अस्मितेपोटीच्या जखमा/ दु:खातील निसर्गाशी स्वामी विवेकानंद अवगत नव्हते का? पण द्वैत विचारातून येणाऱ्या असहिष्णुतेच्या तत्त्वचर्चेत मंदिरांची तोडफोड, धर्मांतरं यांचा उल्लेख करून ते पुढे का जातात? त्यात त्यांना हिंदूंत ‘अहिंसा/ सहिष्णुतेमुळे आलेला’ दुबळेपणाही (!) का दिसत नाही? (गांधी स्वीकारला नाही तरी हरकत नाही; पण जगानं पुतळे उभारले ते ‘दुबळ्या’ अहिंसक गांधींचे असे का?) ज्याच्यासाठी त्यांचा जीव तीळतीळ तुटत होता तो भारत त्यांनाही समर्थच नको होता का? पण तो (स्वत:च स्वत:ची ‘विश्वगुरू’ म्हणून पाठ न थोपटता) विश्वधर्माचा प्रवास अधिक सुकर करणारा असा! त्यासाठी त्यांनी सदैव सामाजिक विषमतेच्या आपल्या कुजलेल्या अंगावर अक्षरश: आग ओकली! मात्र ‘मी हिंदू म्हणून मरणार नाही…’ या शब्दांतील अपार दु:खानं किती धर्मरक्षक संघटनांतील एक पान तरी हललं?(आणि आज ‘धर्म/ राष्ट्र’भक्तीचे रतीब… कालमहिमा!) अस्पृश्यतेमागील अज्ञान/ असहिष्णुता ही मंदिरं तोडफोडीमागील अज्ञान/ असहिष्णुतेपेक्षा श्रेष्ठ म्हणायचं? हा धर्म?

एक साधा प्रश्न- आपण हिंदू वा मुसलमान का आहोत? साधं उत्तर : आमचे आईवडील, त्यांचे आईवडील, त्यांचे त्यांचे आईवडील इ. इ. त्या त्या धर्माचे होते म्हणून. बस्स! बरोबर? आणि तरीही केवढा ज्वलनशील पदार्थ जन्मतो- अस्मिता! तेच राष्ट्र, वंश, भाषा वगैरे समूहांचं. अतिप्रदीर्घ काळातील भौतिक परिस्थिती, इतिहास, संस्कार इत्यादींतून व्यक्ती/समूह यांची मानसिकता घडते, आपण सारेच त्याचे शिकार! बदलायला तसाच बराच काळ जातो (येथील उच्च जाती-पोटजातींतीलही दुरावा/श्रेष्ठ/कनिष्ठ भाव!) हा निसर्ग/ प्रकृती आहे. कोणाचाही (अगदी ‘निधर्मी’ही) द्वेष नको. आजच्या बहुसांस्कृतिक ‘ग्लोबलव्हिलेज’मध्ये गरज आहे ती एकत्वाच्या सूत्राची. प्रत्येक धर्मात सत्यांशाची एक प्रमुख शक्ती असते, आपल्या मोजपट्टीनं कधी दुसऱ्याला मोजून कोणाचाही तिरस्कार/ द्वेष करू नका कारण त्यानं आपलाच अध:पात होतो. काळ उद्या आपलं अज्ञान व आचरणासाठी आपणां सर्वांनाच हसणार आहे.’ असे विचार विवेकानंद मांडतात. समूह संघर्षांबरोबरच तंत्रज्ञान-जनित असंख्य वस्तू/सेवांनी बेभान होणाऱ्या मानवी मनाला कोण आवरील? विज्ञान की ‘विज्ञानाला सामोरा जाणारा’ धर्म?

आणखी वाचा-बालमैफल : आमच्या खिडकीतलं फुलपाखरू

मूळ तत्त्वातूनच हिंदू-धर्माचं एक ऐतिहासिक वेगळेपणही (श्रेष्ठत्व नव्हे!) आलं. हिंदू हा जगातील एकमेव धर्म असावा की ज्याला सुरुवात नाही, जो कोणी स्थापन न करताही व ज्याला कोणताही अधिकृत ग्रंथ नसतानाही तो हजारों वर्षं टिकला आहे. हा धर्म कधी युद्धे, सत्ता व राजाश्रय या आधारे प्रसार वगैरे पावला नाही. आम्हाला बौद्ध/जैनांप्रमाणेच धर्मरक्षणासाठी ना कधी खलिफा लागला, ना पोप! येथील बौद्ध/ जैन धर्मांशी तसंच हिंदूंतीलही असंख्य पंथापंथातही तुलनेनं गंभीर आणि हिंसक झगडे झाले नाहीत. अहिंसा, सहिष्णुता (निदान उपासना मार्गाच्याबाबतींत) हे हिंदूंचं शक्तीस्थान आहे. ‘गांधी ग्रीसमध्ये जन्माला आले असते तर त्यांना फारच विफलता सोसावी लागली असती…’ असे अॅरनॉल्ड टॉयन्बी यांचे विधान आहे. प्रगत पश्चिमेत अक्षरश: लाखो शिष्य लाभूनही हिंदू ‘प्रीचर्स’नी कोणालाही हिंदू केलं नाही. हिंदू हा प्रॉझेलिटायझिंग (धर्मांतर) करणारा धर्म नाही.

पण धर्मांतरांचं तरी उद्याचं नशीब काय दिसतं? हजारो ख्रिाश्चन मिशनऱ्यांनी अतुलनीय सेवाकर्मांद्वारे धर्मप्रसारासाठी जगाच्या कानाकोपऱ्यांत जाऊन आपली अख्खी जीवनं वाहिली; पण आज पश्चिमेतील अनेक अत्यंत प्रगत देशांतून २० ते ३० (नेदरलॅंड्स ५८ ) ख्रिाश्चन नागरीक आपण कोणत्याही धर्माचे नसल्याचं म्हणत असल्याचं जनमत अभ्यास दाखवीत आहेत.

फारच अती दूरच्या भविष्यात, पण माणसाची स्वातंत्र्य-समृद्धीसहित केवळ अखंड शांती-समाधानाची अतीव तीव्र भूक ‘जे काही’ भागवील तो त्याचा (लेबलरहित) धर्म होईल का? व्यक्ती-व्यक्तीच्या त्या भुकेचं स्वरूप आणि म्हणून समाधानाचा मार्गही वेगवेगळा असू शकेल !

‘ज्या दिवशी प्रत्येक व्यक्तीचा धर्म स्वतंत्र होईल तो दिवस मानव जातीच्या इतिहासातील सुवर्णाचा असेल!’ हे विवेकानंदांचे मत आहे. सेमिटिक धर्मांना अधिकृतपणं श्रद्धाधारित ( Faith- based) म्हटलं जातं; भारतीय धर्मांना नाही. का? ‘अगदी राम/कृष्णही झालेच नाहीत असं उद्या सिद्ध झालं तरी हिंदू-धर्माच्या केसालाही धक्का लागणार नाही.’ का म्हणू शकतात स्वामिजी असं?

आणखी वाचा-अन्यथा.. स्नेहचित्रे : अजंठ्याची पुसट रेषा…

शेकडो वर्षांच्या ‘कोऽऽऽहं’च्या (हे विश्व व त्यातील जीवनासहित सर्व काय आहे?) शोधात भारताच्या हाती कोणतं सत्य (स्वप्नाळू आदर्शवाद नव्हे) लागलं? एकोणीसाव्या शतकाअखेरच्या विज्ञानाधारे पश्चिमेत भारतीय वेदान्त ‘दर्शन’ मांडताना विवेकानंद म्हणतात : ‘विश्व ‘काही-नाही’तून तर निर्माण होणार नाही ना? म्हणजे ते ‘काही-तरी’तून निर्माण झाले असले पाहिजे.’ हे जे ‘काही-तरी’ हाच हिंदूंचा ईश्वर/आत्मा/ब्रह्म वगैरे… हे तत्व अजड/ चैतन्ययुक्त ( Consciousness/ Spirit : आपण अनुभवतो ती केवळ शरीर-निगडित जिवंतपणा/ जाणीव नव्हे) नसेल तर (बिग बॅंग नंतरच्या विकासात) ती नवी शक्ती कुठून कशी येईल? विश्वातील एकूण शक्ती कधी वाढत वा कमी होत नाहीत : Law of conservation of energy! …. त्या चैतन्यातच बीजरुपात जे दडलेलं आहे ते विश्वरुपात व्यक्त होतं व ते त्यातच पुन्हा लय पावतं, हे अखंड रहाटगाडगं (‘अव्यक्तात व्यक्तय: सर्वा: …’ गीता ); ‘बीज-वृक्ष-बीज’ हा नियम संपूर्ण सृष्टीलाही का बरं लागणार नाही? (‘नाश: कारणलय:’ – महर्षी कपिल )… विज्ञानाचं ‘क्रमविकास’ म्हणणं बरोबर, पण क्रमसंकुचित ( involution ) अवस्थेशिवाय क्रमविकास ( evolution ) कुठून, कशातून, ‘काही नाही’तून ‘काही’ निर्माण कसं होईल? याच्याशीच संबंधित देश, काल, गती इत्यादींविषयी सखोल मांडणीही स्वामीजींनी पश्चिमेतील अभ्यास वर्गातून केली आहे. ते, तेव्हा वा आज, चूक/ बरोबर हे ठरवण्याचा अधिकार विज्ञान अभ्यासकांचा. मात्र अनेक वैज्ञानिक शोधांना चर्चनं धर्माधारे केलेल्या विरोधाबद्दल मागाहून पोपनी सतत माफी मागत राहण्यासारखे प्रसंग इथे आलेच नाहीत ते वरील दृष्टीमुळेच! ज्यानं ख्रिाश्चनांच्या पश्चिमेत जणू हाहाकार उडवला त्या डार्विनमुळेही हिंदू-धर्म तिळमात्र गडबडला नाही.

‘यदा सर्वे प्रमुच्चन्ते…’ (‘कठ’) : (‘अस्मिते’सहित) सर्व ‘मी-माझे’, ‘ते-त्यांचे’तून मुक्त झाल्यावर ‘याचि देही’च अनंत अविनाशी चैतन्यात विरून जाणं हेच तर हिंदूंचं जीवन श्रेयस: मोक्ष (‘… तुका झाला आकाशाएवढा’)! वरील सोनेरी वारसा उधळून हिंदू-धर्म आणि मोक्ष म्हणून आपल्या हाती काय बरं उरेल?

rajadesai13@yahoo.com

Story img Loader