जफिया मोकाशी

मुलं परीक्षेनंतर येणाऱ्या सुट्टय़ांची आतुरतेने वाट पाहत असतात. कोणी मामाच्या गावाला, आजोळी जाणार असतं, तर कोणी आपली सुट्टी वेगवेगळय़ा प्रकारच्या आपल्यातील कलागुणांना विकसित करण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतात. जी मुले आपला वेळ वाचनासाठी घालवतात त्यांच्यासाठी एक खूशखबर म्हणजे या मुलांसाठी खास पुस्तके बाजारात आली आहेत.

three day book Exhibition held on occasion of Granthali Readers Day attracting over 3000 visitors from Thane
चरित्र ग्रंथ, कवितासंग्रह सह वैचारिक विषयांवरील पुस्तकांना ठाणेकरांची पसंती
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
More than 25 lakh books sold at Pune Book Festival with turnover of 40 crores
पुणे पुस्तक महोत्सवात यंदा पुस्तक विक्रीत चौपटीने वाढ; किती झाली उलाढाल?
pune Wachan Sankalp Maharashtra activity held from January 1 to 15 to promote book reading
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा नवा उपक्रम; १ ते १५ जानेवारी दरम्यान होणार काय?
Director and artist Pravin Tarde gifted novel Fakira to Gautami Patil
दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट
nagpur school students loksatta news
आता गणवेश शाळांमार्फतच, शैक्षणिक सत्र सुरू होताच ४५ लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

खरंच असं झालं!

आजच्या या यांत्रिक युगात आजी-आजोबांपेक्षा त्यांची नातवंडं जास्त स्मार्ट असल्याचा अनुभव आपल्याला येतो. अशीच स्मार्ट नातवंडं प्राण्यांची व पक्ष्यांचीसुद्धा असतील अशी कल्पना करून त्या नातवंडांचा स्मार्टनेस- राजीव तांबे यांनी ‘खरंच असं झालं!’ या पुस्तकातील कथांमध्ये रेखाटला आहे.

आपण ज्या जुन्या कथा उदा. सिंह आणि उंदीर, हुश्शार कावळा, मगर आणि माकड या आपल्या आजी-आजोबांकडून ऐकून मोठे झालो, त्याच कथा, पण त्यांच्या स्मार्ट नातवंडांच्या स्मार्टनेसमुळे कशा वेगळय़ा होतील या कल्पनेचा आधार घेऊन लेखकाने लिहिल्या आहेत.

खरंच असं झालं!’, राजीव तांबे, समकालीन प्रकाशन, पाने – ५०, किंमत – १०० रुपये.

मदतीचा हात

‘मदतीचा हात’ हा ज्योती कापिले यांचा ‘मदत करणे’ ही जी माणसाची श्रेष्ठ भावना आहे याला खतपाणी घालणाऱ्या कथांचा संग्रह आहे. या संग्रहातील कथांचे विषय, आशय मुलांच्या भावविश्वाशी एकरूप होणारे आहेत. कथांची भाषा मुलांना रुचणारी आहे. म्हणूनच या कथा मुलांना आपल्या वाटतील यात शंकाच नाही.  ‘पूर्णब्रह्म’, ‘मदतीचा हात’, ‘आनंद’, ‘खेळणी’, ‘शेफ सोहम’, ‘भाजीचं गणित’ या सहा कथा या पुस्तकात संग्रहित करण्यात आल्या आहेत.

मदतीचा हात’, ज्योती कपिले, जे. के. मीडिया प्रकाशन, पाने – ४८,  किंमत – ८० रुपये.

मूषकस्वामींचा दंगा, राणीला इंगा!आणि आम्ही स्मार्ट मुलं!

सुरेश वांदिले यांची दोन पुस्तके बाजारात आली आहेत. ‘मूषकस्वामींचा दंगा, राणीला इंगा!’ या पुस्तकात मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल अशा गोष्टी आहेत. मुलांना कल्पनाविश्वात रमायला खूप आवडतं. आपल्या मनातल्या कल्पनांसह मुले आपल्या भावविश्वात जगतात. या कथेतसुद्धा याच भावनेचा आधार धरून पुसीकॅट मूषकस्वामी इंग्लंडची राणी आणि सिद्धिविनायक यांच्या अनुषंगाने ही गोष्ट गुंफली आहे. ही गोष्ट सर्वानाच आवडेल अशी आहे.

सिद्धिविनायकाची भक्त असलेल्या पुसी कॅट मुंबईवरून मोठय़ा प्रेमाने लंडनला राणीला भेटायला जाते; पण राणी तिचा अपमान करून सैनिकांना तिच्या शेपटीला पकडून गरगर फिरवून आकाशात भिरकावून देण्याचा आदेश देते. आपल्या या भक्ताच्या अपमानाचा बदला घेऊन राणीला धडा शिकवण्याचा आदेश सिद्धिविनायक मूषकस्वामीला देतात – मग पुढे काय होते? याचा उलगडा करणारी ही गोष्ट आहे. अतिशय रंज ‘मूषकस्वामींचा दंगा’, राणीला इंगा!, सुरेश वांदिले, ग्रंथाली प्रकाशन, पाने – ५३, किंमत – १२०. ‘आम्ही स्मार्ट मुलं!’,

सुरेश वांदिले, ग्रंथाली प्रकाशन, पाने – ६३, किंमत – १५० रुपये.

म्हणजे म्हणजे? वाघाचे पंजे

‘म्हणजे म्हणजे? वाघाचे पंजे’ हे कवी प्रमोद नारायणे यांच्या बालकविता संग्रहाचे शीर्षक मोठे लक्षवेधी, आकर्षक आणि मुलांच्या मनात उत्सुकता निर्माण करणारे आहे. या संग्रहातील कविता वाचताना शब्दांची पुनरुक्ती आणि लय, शब्दांना असलेला नाद आणि ताल याची गंमत मुलांना अनुभवता येईल. या कविता सहज, सोप्या आणि मजेदार अशा आहेत. त्या मुलांना नक्कीच आवडतील. या कवितासंग्रहाचे वैशिष्टय़ म्हणजे लहान मुलांना नेहमीच आवडणारे बोलके प्राणी, पक्षी, झाडे, वेली, पाने, फुले, पाऊस यांचे मजेदार जग कवीने उभे केले आहे. या कवितांना चित्रांनी अधिक रंगत आणली आहे. ‘इज्जा बिज्जा तिज्जा’ या बालगीतातून कवीने आजच्या मुलांना पिझ्झा- बर्गर हे जे पदार्थ खाण्यासाठी आवडतात ते न खाता वरण-भात, भाजी, ताजी फळे या गोष्टी खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे असा नकळत संदेश दिला आहे.

‘म्हणजे म्हणजे?

वाघाचे पंजे’, प्रमोद नारायणे, साहित्य संपदा प्रकाशन, पाने – ३ , किंमत – १०० रुपये.

ही सर्वच पुस्तके बालवाचकांना रुचतील अशी आहेत.  चित्रांचा वापर करून कथा-कविता अधिक रंजक केल्या आहेत. ही सर्व पुस्तके मुलांना आपल्या काल्पनिक दुनियेत नेतीलच, पण वास्तव जागाचीही ओळख करून देतील.

jafiyamokashi@gmail.com

Story img Loader