एक दिवस असाच विचार करीत दुकानात बसले असताना, सकाळी अकराच्या सुमारास त्यांना एक गोरे, उंच, नीटनेटके कपडे घातलेले, दाढी-मिशा नसलेला गुळगुळीत चेहरा असलेले गृहस्थ दुकानासमोर उभे असलेले दिसले. रस्त्यावरूनच ते म्हणाले, ‘समाधान बापूराव लोकरे नावाचे लेखक इथेच राहतात का?
लोकरे भांबावून गेले. भारावून गेले. गहिवरून गेले. आयुष्यात पहिल्यांदा एक इतका चांगला माणूस इतक्या आदराने त्यांना लेखक म्हणत होता. ते धावतच बाहेर आले. ‘या या’ म्हणत गुळगुळीत गृहस्थांना दुकानात घेऊन गेले. आतल्या खोलीत जाऊन लोटीपेला घेऊन आले, पण गृहस्थ पाणी प्यायले नाहीत. शांतपणे
मणेकरांसमोर लोकरे स्टुलावर बसले होते. आपल्या डोळ्यात पाणी येईल किंवा आपण लोळागोळा होऊन मणेकरांच्या पायावर पडू की काय, अशी भीती लोकरेंना वाटू लागली. त्यांनी कसेबसे स्वत:ला सावरले. पाणी किंवा सुपारीही न घेता जाणारे मणेकर त्यांना देवदूतासमान वाटू लागले. हस्तलिखिताची वही घेऊन मणेकर निघून गेले तरी काहीतरी अद्भुत घडल्याप्रमाणे लोकरे आनंदाच्या डोंगरावर बसून होते. टवाळक्या करणाऱ्या गावातल्या लोकांना ही गोष्ट इतक्यात सांगायचीच नाही. एकदम प्रकाशन समारंभाचीच निमंत्रणपत्रिका घेऊन जाऊ.. मात्र बायकोला ही गोष्ट सांगितलीच पाहिजे, असे त्यांना वाटले. ‘माझे पुस्तक छापणारेत प्रकाशक..’ असे सांगितल्यावर ती म्हणाली. ‘भारीची च्यापत्ती नाई अन् भरडासुपारी संपल्ती म्हनून दोन गिराइकं वापस गेल्ती सकाळी, तेवढं सामान आनुन ठुवा..’
.. मग समाधान बापूराव लोकरे यांचा लेखक होण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. मणेकर त्यांना जाफ्राबादला बोलावू लागले. एकदा त्यांनी स्पष्टच सांगितले की, त्यांच्या म्हणजे मणेकरांच्या बायकोच्या आजारपणामुळे ते अडचणीत आले आहेत. पुस्तक काढायसाठी पन्नास हजार खर्च येतो, तर लोकरेंनी किमान दहा हजाराची तरी सोय करावी. पुस्तक अर्धे छापून झाले आहे आणि छापखान्याचे बिल द्यायचे आहे. लोकरेंनी भीतभीत काही छापलेली पाने पाहण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मणेकर म्हणाले, अहो इथे जिल्ह्य़ाच्या ठिकाणी अव्वाच्या सव्वा भाव असतात म्हणून आम्ही बाहेरगावाहून छापून घेतो. लोकरे घरी परत आले आणि बायकोपोराची नजर टाळून घरात वावरू लागले. मुलीला तिच्या मामाने दिवाळीत चांदीच्या तोरडय़ा केल्या होत्या. त्या लोखंडी ट्रंकेत होत्या. लोकरेंना लाज वाटली एकदाच; पण लेखक होण्याचे स्वप्न हातातोंडाशी आले असताना कच खाणे बरोबर नाही असे त्यांच्या मनाने घेतले. तोरडय़ा काय पुस्तक निघाल्यानंतर काहीतरी उलाढाल करू आणि पुन्हा ट्रंकेत गुपचूप ठेवून देऊ आणि मणेकरांना दहा हजार पोचले. तोरडय़ा गहाण ठेवून भागत नव्हते, म्हणून विकल्या; तरीही रक्कम पूर्ण होईना म्हणून उधारउसनवार केली आणि मणेकरांची भरती पूर्ण केली.
नंतर मणेकरांनी कळवले की पुस्तकाचे मुखपृष्ठ करायचे आहे तर चित्रकाराला हजार पाचशे तरी द्यावे लागतीलच, तेवढे तातडीने पाठवा. लोकरेंनी पाठवले. लोकरेंच्या बायकोला असे वाटायला लागले की, आपल्या नवऱ्याची नजर आजकाल घरभर इथे तिथे काही तरी शोधत असते आणि या किंवा त्या वस्तूवर बराच वेळ खिळून राहते.
मध्ये एकदा मणेकरांकडे गेले तेव्हा वीस रुपयाच्या की शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लोकरेंच्या सह्या त्यांनी घेतल्या. ‘हा ‘करारनामा’ आहे. याच्या झेरॉक्स प्रती काढतो व नंतर तुम्हाला पाठवतो’, असे म्हणाले. नंतर मणेकरांचा निरोप आला की तुम्ही नवोदित लेखक आहात, तुम्हाला कोणी सध्या ओळखत नाही म्हणून पुस्तकाला प्रस्तावना हवी. तेव्हा लवकर कोणाकडून तरी लिहून घ्या न् पाठवा. पुस्तक खोळंबलेय. की मी लिहवून घेऊ इथेच?’
एकदम घाबरून लोकरेंनी कळवले, ‘नको, मी पाठवतो.’ मग लोकरे स्थानिक महाविद्यालयातील मराठीच्या निवृत्त होऊ घातलेल्या विभागप्रमुखांकडे गेले. ते प्राध्यापक गेल्या तीस वर्षांपासून ‘ज्ञानराज माउलींचे पसायदान’ या एकाच विषयावर छोटय़ा-छोटय़ा गावात व्याख्यान देत असायचे. ‘विनामूल्य लेखन केले तर लेखकाची किंमत राहात नाही’ असे सुरुवातीलाच सांगून प्रस्तावनेसाठी तीनशे रुपयांची मागणी प्राध्यापक महोदयांनी केली. अखेर हो-नाही करताकरता दोनशे रुपयांवर सौदा तुटला.
पुस्तकाचा प्रकाशन समारंभ करायचा का, असे मणेकरांनी विचारताच लोकरेंना दरदरून घाम फुटला. लोकरेंनी एक-दोन प्रकाशन समारंभ जवळून पाहिले होते. विशेषत: प्रकाशनानंतरचा समारंभ पाहून तर ते पळूनच आले होते.
अखेर एक दिवस पुस्तकांचा गठ्ठा आला. त्यात दहा प्रती होत्या. मुखपृष्ठावर फक्त वेडीवाकडी अक्षरे होती. ‘दु:खाचा कडेलोट’ हे कादंबरीचे शीर्षक इतके जाड टायपात होते की आकारात कोंबून बसवल्यासारखे वाटत होते. आपले पूर्ण नाव- ज्यात वडिलांचेही असावे असे वाटत होते- तसे न छापता केवळ ‘समाधान लोकरे’ असे लेखक म्हणून छापले होते. लोकरेंनी अर्पणपत्रिका वाचली. आई-वडिलांच्या स्मृतीला पुस्तक अर्पण केले होते. बायको, मुलगा आणि मुलगी यांचे आभार मानले होते. मुलीचे नाव वाचताना लोकरेंना तोरडय़ा आठवल्या आणि भडभडून आले..
काही दिवसांनंतर मणेकरांचा निरोप आला तेव्हा जड पायाने लोकरे गेले. मणेकर म्हणाले, ‘मी सध्या घाईत आहे. वेळ नाही. पण तुम्हाला यासाठी बोलावले की, इथली एक संस्था दरवर्षी वीस लेखक-कवींना पुरस्कार देते. समारंभ मोठा असतो. त्याला एक मोठा लेखक व एक मंत्री येतात, पण आजकाल आयोजनाला खर्च खूप येतो. त्यांची वीसजणांची यादी तयार होती, पण त्यातला एक कापून तुमचे नाव त्यात टाकतो. एक हजार ताबडतोब उद्याच्या उद्या पाठवून द्या..’
लोकरे विषण्णपणे हसले. आता विकण्यासारखे काही नव्हते. किराणा दुकान बंद पडल्यात जमा होते, पण बक्षीस आता नाही मिळाले तर पुढची शाश्वती काय? लोकरेंनी हिंमत केली. एक हजार रुपये व्याजाने काढले. मणेकरांना नेऊन दिले. बक्षीस समारंभात रांगेत उभे राहिले. पन्नास रुपये फोटोग्राफरला देऊन एक कॉपी घेतली. पाकिट उघडले तेव्हा त्यात घोषित केलेली बक्षिसाची रक्कम नव्हती. संस्थेचे प्रमाणपत्र होते!
लोकरे आणि मणेकर दोघेही सरस्वतीचे पुत्र! पण या दोघांच्या कार्याची देवी सरस्वतीला काही माहिती आहे किंवा नाही, हे कळावयास मार्ग नाही.
सारस्वत
समाधान बापूराव लोकरे नावाचे गृहस्थ एका तालुक्याच्या ठिकाणी राहतात. जवळच्या खेडय़ावर त्यांची चार एकर कोरडवाहू शती आहे. तेवढय़ावर भागत नाही म्हणून ते वडिलांच्या मृत्यूनंतर तालुक्याच्या गावी आले. एका टोकाला लहानसे विटामातीचे घर बांधले. समोरच्या खोलीत किराणा दुकान टाकले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-05-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व ऱ्हस्व आणि दीर्घ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of a writer