‘सुधा मूर्तीच्या बालकथा’ हे अलीकडेच प्रकाशित झालेलं पुस्तक. सुधा मूर्ती यांचं कथाबीज, लेखन आणि लीना सोहोनी यांचा सुंदर अनुवाद, तसंच प्रियांका पाचपांडे, प्रिया कुरिअन यांची सुरेख चित्रे या सचित्रकथा पुस्तिकेत आहेत. या पुस्तकात ‘कांद्याला इतके सारे पदर कुठून आले?’, ‘आंब्याला त्याची जादू कशी प्राप्त झाली?’, ‘पृथ्वीला तिचं सौंदर्य कसं प्राप्त झालं?’, ‘समुद्राचं पाणी खारट कसं झालं?’ या चार कथांचा समावेश आहे.
हेही वाचा : हिंदूंच्या ‘राजकीय पर्यटना’चा आरंभ
कांद्याला इतके पदर का असतात आणि तो चिरताना आपल्या डोळयांतून पाणी का येतं याची कथा रंजक आहे. आंब्याला गोडी कशी प्राप्त झाली तसंच आपली पृथ्वी निसर्गसौंदर्यानं कशी नटली, गोडं असलेलं समुद्राचं पाणी कसं खारट झालं याच्या मजेशीर गोष्टी पुस्तकात आहेत.
‘सुधा मूर्तीच्या बालकथा’, – सुधा मूर्ती, अनुवाद- लीना सोहोनी,
पाने-१५०, किंमत- ४७५ रुपये.