चहाचा घुटका घेताना फेसबुक न्याहाळणे हा माझा आवडता संध्याकाळचा कार्यक्रम. माझ्यासाठी ते फार मोठे विरंगुळय़ाचे चार क्षण.. आजही तेच करीत होतो.. आईने केलेल्या अमृततुल्य (आमच्या पुण्यात या नावाची चहाची दुकाने आढळतात) चहाची चव घेताना व्हॉट्स अपवर एकाने फॉरवर्ड केलेला एक भन्नाट मेसेज वाचनात आला. चहा आणि कॉफी या आपल्या दोन रोजच्या पेयांवर चक्क तुलनात्मक कविता..
चहा म्हणजे.. तरतरी
कॉफी म्हणजे.. स्टेटमेंट.
 चहा म्हणजे.. दुनियादारी
कॉफी म्हणजे.. रिलेशनशिप.
चहा म्हणजे.. याराना
कॉफी म्हणजे.. प्यार का अफसाना.
चहा म्हणजे.. कटिंग
कॉफी म्हणजे.. मीटिंग.
चहा म्हणजे.. एक्सायटेशन
कॉफी म्हणजे.. रिलॅक्सेशन.
 चहा म्हणजे..टपरी
कॉफी म्हणजे.. हाऊस.
चहा म्हणजे.. गजाली
कॉफी म्हणजे.. गझल.
चहा म्हणजे.. पाऊस धुवांधार
कॉफी म्हणजे.. दाटलेला धुक्याचा अंधार.
चहा म्हणजे.. चिंब भिजताना
कॉफी म्हणजे.. भिजलेले केस सुकताना.
चहा  म्हणजे.. कडकडून शेकहॅण्ड
कॉफी म्हणजे.. औपचारिक हॅण्डशेक.
चहा म्हणजे.. धडपडीवर मात
कॉफी म्हणजे.. धडकन की बात.
चहा पिताना.. मन भविष्याळू
कॉफी पिताना.. मी स्वप्नाळू.
रचनाकाराचे नाव नव्हते पण ते शब्द मला झपाटून टाकते झाले. त्यातून साधम्र्य साधणाऱ्या नव्या कल्पना मला सुचल्या आणि मी लिहिता झालो..
आपल्याला समजायला लागल्यापासून आपली समज जाईपर्यंत ही दोन पेये आपली साथसोबत करतात. ‘शायद मेरे शादी का खयाल..’ म्हणत कांदे-पोहय़ांवर वाफाळलेली महिरप धरतात. हातगाडी ओढणाऱ्या मुकेशपासून अ‍ॅस्टन मार्टिनवाल्या मुकेशभाईपर्यंत सर्वाची तलफ भागवितात आणि मानवी आयुष्याला तरतरी, उमेद आणि उल्हासाची अलौकिक देणगी देतात.
ख्रिस्तपूर्व २७३७ वर्षांत चीनच्या सम्राटाची स्वारी दुपारी उन्हात उकळविलेले पाणी पीत बसलेली होती. तेव्हा आलेल्या वाऱ्याने काही झुडपांची पाने उडून त्या पाण्यात पडली. पाण्याला रंग आला, स्वाद आला, वास आला आणि सम्राटाला तरतरी आली. शाही फर्मान सुटले आणि हय़ा पेयाची औषधी आणि उत्तेजित म्हणून गणना करण्यात आली.  सुरुवातीच्या काळात फक्त राजे-उमरावांची मक्तेदारी असलेला हा चहा हळूहळू चीनच्या जना-मनांत रुजला. ध्यानधारणा करणाऱ्या बुद्धिस्ट झेन उपासकांनी तो जपानला नेला. सुफी संतांनी त्याला आपलेसे केले. जपानमध्ये त्याला लोकाश्रय लाभल्यावर ‘जपानी चहापान सोहळ्याचे’ सोपस्कार अस्तित्वात आले. सतराव्या शतकात चार्ल्स तिसरा ह्याच्या एका पोर्तुगीज राणीने चहाला इंग्लंडमध्ये राजप्रासादात प्रवेश दिला. ईस्ट इंडिया कंपनीतून चहाची वाहतूक सुरू झाली. कराचा बोजा वाढला, तसे स्मगिलग सुरू झाले. अमेरिकेकडे निर्यात सुरू झाली आणि भरमसाट करापोटी तो मूठभरांची मक्तेदारी बनल्यामुळे बोस्टन टी पार्टीतून पुढची राजकीय उलथापालथ चहाने घडवून आणली. सगळीच वादळे पेल्यात शमली नाहीत, पण काळपट भुकटीतून तयार होणाऱ्या या सोनेरी-लाल द्रव्याला राजकीय-सामाजिक परिमाण लाभले हेच खरे!
कॉफीचा प्रवास इथियोपियातून सुरू झाला. एका विशिष्ट जातीच्या झाडाच्या बिया खाल्ल्यावर आपली मेंढरं उत्तेजित होतात आणि रात्रभर झोपत नाहीत, हे काल्दी धनगराच्या लक्षात आले. त्याने ते जवळच्या प्रार्थनास्थळातील धर्मगुरूला सांगितले. आता या बियांपासून दळलेली कॉफी मठांची मक्तेदारी बनली. कॉफी मुक्त होऊन जगात इतरांपर्यंत पोहचायला अरब राष्ट्रांनी मदत केली. येमेन, पर्शिया, इजिप्त, सीरिया, टर्कीचा मार्ग खुला झाला. कॉफी हे समाजात परस्परांनी भेटल्यावर एकत्र येऊन प्यायचे पेय झाले. ‘कहावेह खानेह’ अर्थात कॉफी हाऊसेस बांधली गेली. आज आपण CCD  किंवा Starbucks‘२ मध्ये जातो आणि Anything can happen over a coffee!! हे सत्य स्वीकारतो.  याचा उगम या सामुदायिक कॉफी पिण्याच्या प्रथेत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. समाजातील प्रज्ञावंतांचे हे अड्डे वाढले आणि पब संस्कृती त्यांचे उच्चाटन करू शकली नाही, हे महत्त्वाचे आहे. सतराव्या शतकात कॉफी युरोपात अवतरली. तिच्या कडवट चवीमुळे काहींनी ‘सतानाचे पेय’ म्हणून संभावनाही केली. पण समाजाने मात्र तिला स्वीकारले. ‘‘एक पेनी द्या, कॉफी प्या आणि कशावरही चर्चा करा.’’ यातून इंग्लंडमध्ये ‘पेनी युनिव्हर्सटिी’ निर्माण झाल्या आणि तीनशेहून अधिक कॉफी हाऊसेस उदयास आली.  अधिकृत-अनधिकृत मार्गानी कॉफीच्या बिया जगात दूरवर पोचल्या आणि ब्राझीलपासून चिकमंगळूपर्यंत कॉफीचे मळे फुलले.
आज कोपऱ्यावरच्या टपरीपासून, सायकलवाल्या अन्नापर्यंत, आणि गल्लीतल्या उडप्यापासून दिल्लीतल्या सप्ततारांकित कॉफी शॉपपर्यंत चहा-कॉफीने सावलीसारखी आपली सोबत केली आहे. कधी वाढवून तर कधी चढवून आपण त्यांचा स्वाद घेतला आहे. आमच्या परळच्या नाक्यावर फूटपाथवर उभे राहून गावोगावच्या मंडळींनी लग्नाची बोलणी पक्की केली आहेत आणि जिनेव्हा कन्व्हेन्शनच्या वाटाघाटीही चहाच्या भुरक्यांनी घडवून आणल्या आहेत. एक वेळ आपण जेवण विसरू, पण चहा-कॉफीला पर्याय नाही हेच खरे.
..१९६०-७० ची आठवण झाली.  आमच्या मामीच्या धाकटय़ा भावाने- विकासमामाने नवी पांढरीशुभ्र व्हेस्पा स्कूटर घेतली होती. त्यावर लाल रंगाच्या सेलोटेपने त्याने त्याच्या समस्त वर्गभगिनींना (शेवटपर्यंत त्या भगिनीच राहिल्या, मामी राग मानू नये।)  प्रश्न केला होता.. ‘टी, कॉफी ऑर मी?’  ‘Tea, Coffee or me?’
.. अस्मादिक तेव्हा शाळेत हाफ-पँटमध्ये असल्यामुळे त्या प्रश्नाचा गíभतार्थ आमच्या ध्यानी आला नव्हता. आज पन्नास वर्षांचा काळ उलटलाय, मामा आजोबा झालाय, त्याची व्हेस्पा इतिहासजमा झालीय, आता मामाचा नातू हायस्कूलमध्ये जातोय आणि वर्गातल्या ‘आयटेम’ मंडळींना तोच प्रश्न विचारतोय.. ‘टी, कॉफी ऑर मी?’

ladies group dance on marathi song Bai Mi Patang Udvit Hote marathi old song video goes viral
“गं बाई मी पतंग उडवीत होते” महिलांनी मकरसंक्रांतीला काळ्या साड्या नेसून केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
amaltash movie
सरले सारे तरीही…
Story img Loader