अरुंधती देवस्थळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमूर्तवादी चित्रांमागे अमुक एक अशी विचारप्रक्रिया नसते. सोप्या, सरळ शब्दांत सांगायचं तर प्रत्येकाचा अमूर्तवाद वेगळा. बहुतेकांचा हा प्रयत्न ‘आकारातून अध्यात्माकडे जाण्याचा’ असं वाचनात येतं. सामान्यजनांना या शैलीतली चित्रं समजावून घ्यायची असतील तर गाभ्याकडे नेणारी वाट त्या चित्रकाराच्या ओळखीतून, लेखनातून सापडू शकते. अमूर्तवादी चित्रकारांत मार्क रॉथको, जोन मीरो, पॉल क्लेई किंवा पीट मोन्द्रिआनसारख्यांनी आपापल्या कलेबद्दल इतकं व्यवस्थित लिहून ठेवलंय, की ही वाट सुकर होते. चित्रं अमूर्त असली तरी त्यांच्याबद्दलचं भाष्य विरोधाभासातून वाट काढणारं असू शकतं. पीट मोन्द्रिआनचंच म्हणावं तर अगदी साधं विधान- ‘‘ Every true artist has been inspired by the beauty and colour and the relationship between them, than by the concrete subject of the picture. आणि याच्या पुढलंच विधान- अ१३ ‘‘Art is not made for anybody and at the same time, for everybody.’’ अशा प्रथमदर्शनी विरोधी वाटणाऱ्या वृत्ती मोन्द्रिआनच्या कलेतही उमटतात. विरोधाभास असून अतिशय तर्कशुद्ध, पायरी-पायरीने ( linear) झालेली शैलीची प्रगती दाखविणारे ते एक वेगळेच कलाकार वाटतात. आता कुठल्याही कलासंग्रहालयात प्राथमिक रंगांतील आयत आणि चौकोनांच्या सरळ काळ्या रेषेने विभागलेल्या लक्षवेधी मांडणीत मोन्द्रिआन भेटतात. तीच त्यांची बघताक्षणी पटणारी ओळख. पण त्यामागची कारणपरंपराही महत्त्वाची. त्यात दोन परस्परविरोधी प्रेरणा दिसतात. एका बाजूला त्यांना झपाटून टाकणारा जॅझमधला ताल (ऱ्हीदम) आणि दुसरीकडे तंत्रशुद्ध, समतोल राखणारी मांडणी मोन्द्रिआनचा (१८७२-१९४४) जन्म डच चित्रकार कुटुंबातला.
वडील चित्रकलेचे शिक्षक. काकाही चित्रकार. नदीकाठी असलेल्या शांत गावात बालपण गेलेलं. ते लहानपणापासूनच निसर्गचित्रं काढत. पुढे ॲमस्टरडॅमला जाऊन त्यांनी तीन वर्षांचा चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि वडिलांसारखेच तेही शाळेत कलाशिक्षक बनले. दरम्यान, थोर कलाकारांची चित्रं पाहून त्यांच्या प्रतिकृती बनवणं सुरूच होतं. स्वत:ची सुरुवातीची निसर्गचित्रंही पारंपरिक डच धाटणीची- म्हणजे निळं आकाश, तरंगणारे पांढरे ढग, समुद्रापलीकडे दिसणारं क्षितीज, निसर्गात उघडणारी खिडकी, वगैरे.. हेग स्कूलचा प्रभाव दाखवणारी. कॅनव्हासच्या दोन- तृतियांश भागात क्षितीज आणि एक-तृतियांश भागात चित्र असं काहीसं. लवकरच हे प्रमाण उलट होताना दिसतं. अगदी कॅनव्हाच्या एक-अष्टमांश भागात क्षितीज.. इथपर्यंत. पण ही चित्रं फारशी विकली जात नव्हती आणि मनात ‘नेति नेति’चा घोष थांबत नव्हता.
बालपणात जगलेल्या निसर्गाचा पगडा त्यांच्या कलेत पहिली काही दशकं जाणवतो. यादरम्यान वान गॉगचं काम पाहण्यात आलं आणि त्यांच्या चित्रांतले दमदार फटकारे आणि प्रसन्न रंगांतील निसर्ग पाहून मोन्द्रिआननी त्यांच्या आवडत्या झाडांकडे लक्ष वळवलं. पाच वर्ष ते झाडंच काढत राहिले. फांद्या, झाडाचा देह आणि पर्णराजीचे विन्यास. मग हळूहळू तपशील गाळले गेले आणि फक्त उभ्या आणि आडव्या रेषांमधून त्यांचं असणं कॅनव्हासवर उमटू लागलं. पण चित्रं विकेनात. फक्त फुलांची चित्रं विकली जात. १९११ मध्ये पॅरिसमधल्या चित्रप्रदर्शनांच्या निमित्ताने मोन्द्रिआननी पॅरिसला बस्तान हलवलं. तिथे जॉर्ज ब्रॉक आणि पिकासोसारखे क्यूबिस्ट भेटले आणि झाडांच्याच भाषेत बोलायचं तर- फांद्यांइतकेच त्यांच्यामुळे रिकाम्या जागेत निर्माण होणारे आकार त्यांना महत्त्वाचे वाटू लागले. आता समोर आव्हान हे होतं, की झाड दिसतं तसं न दाखवता आकार आणि रेषांमधून त्याचं सत्त्व नेमकं कसं साकार होणार? जोडीला नव्याने घेतलेल्या डच थिओसॉफिकल सोसायटीच्या सदस्यत्वाचाही परिणाम म्हणून या काळातल्या चित्रांपासून त्यांनी चित्रांची शैली बदलली आणि त्याबरोबरच ‘कम्पोजिशन’सारख्या शीर्षकांची सुरुवात झाली. यात आपल्याला आवश्यक असलेली एक मोकळीक मिळतेय हे त्यांनी लक्षात घेतलं. १९११ मध्ये वडिलांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना भेटायला हॉलंडला गेलेले मोन्द्रिआन पहिल्या महायुद्धामुळे तिथेच अडकले आणि १९१८ मध्ये परत पॅरिसला जाऊ शकले.
युद्धात मानवी क्रौर्यामुळे ओढवलेला अकल्पनीय विध्वंस बघता हा कालावधी सर्जनशील मनांना अंतर्मुख करणारा होता. आजवरचे यथार्थवादी वा क्युबिझम, किंबहुना सगळेच प्रस्थापित संकेत मोडून दिसतं तसं चित्रण करण्यापेक्षा अनावश्यक ते सगळं काढून टाकून नॉन-रिप्रेझेंटेशनल फॉर्ममध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करावा असा विचार त्यांच्या डच चित्रकार मित्रमंडळींत सुरू झाला. त्याला त्यांनी ‘निओप्लास्टिसिजम’ असं नाव दिलं. मोन्द्रिआनच्याच शब्दांत- Neoplasticism is finding expression in abstraction of form and colour, that is to say in straight line and the clearly defined primary colour.हा विचार इतका पक्का झाला, की पॅरिसला परतताना त्यांनी स्वत:ची आधी केलेली सर्व निसर्गचित्रं, जलरंगातील फुलांची चित्रं ठोक भावात एका आर्ट डीलरला विकून टाकली. निर्थक वाटणारा कालखंड आयुष्यातून पुसून टाकावा, तसं.
१९२० च्या सुरुवातीला आलेलं ‘कॉम्पोजिशन ए’ हे त्यांचं पहिलं निओप्लास्टिक पेंटिंग! यात निळे, पिवळे, लाल, पांढरे, राखाडी, काळे आयत आणि चौकोन- काळ्या फक्त उभ्या किंवा आडव्या सरळ रेषांनी एकमेकांपासून विभागलेले. या रेषा आखल्यासारख्या वाटतात, पण त्या अतिशय काळजीपूर्वक ब्रशने पेंट केलेल्या आहेत. या चित्राबद्दल ते म्हणाले होते, ‘‘आजवरच्या केलेल्या सर्व कामानंतर हे चित्र मला समाधान देणारं ठरलं आहे.. लांबलेल्या भटकंतीनंतर मुक्कामाला पोहोचावं तसं.’’ यानंतर त्यांचं पॅलेट लाल, निळा आणि पिवळा या तीन प्राथमिक रंगांचं आणि तीन मूलभूत छटांचं- पांढरा, काळा आणि करडा. त्यांच्या चित्रांमध्ये पांढऱ्याचा अतिशय नाटय़पूर्ण वापर दिसतो. याची मग मालिकाच सुरू झाली आणि मोन्द्रिआन म्हणजे या शैलीतली चित्रं असं समीकरण रूढ झालं. काही रंग नजरेत भरावेत असे सामोरे येतात आणि काही तेवढेच ताकदीचे असून मागे पडतात, याला कारण संदर्भ. या तत्त्वावर मातीसनेही काम केलं असावं का? ते आणि पिकासो मोन्द्रिआनच्या याच शैलीत केलेल्या सुप्रसिद्ध ‘रु द देपार्ट’मधल्या स्टुडिओत अनेकदा जात. एका वेगळ्याच शैलीत केलेला हा स्टुडिओ कलावर्तुळात आणि वार्ताहरांमध्ये चर्चेचा विषय झाला होता. मोन्द्रिआन िभतींवर रंगांचे चौकोन कापून ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून बघत आणि नंतर चित्र काढत. रंग एकमेकांशी बोलतात, संवादातून विरोध किंवा समन्वय घडून येतो असं ते म्हणत. या काळात कलेला वाहिलेल्या मासिकांत आणि वृत्तपत्रांत त्यांनी स्वत:च्या कलेमागची भूमिका, निओप्लास्टिसिजम आणि जॅझसकट नव्या पिढीच्या संगीतावर भरपूर लिहिलं आहे.
प्रयोगशीलतेत त्यांनी पतंगाकृती कॅन्व्हासवर पेंटिंग्जही केली. या मालिकेला ‘एक्सपेरिमेंटल डायमंड्स’ (किंवा ‘लॉझेंजेस’) असं नाव दिलं. पांढऱ्यावर काळे आयताकार, त्यात वेगवेगळं प्रमाण, काळ्या ठळक रेषा, त्यांची रुंदी कमी-जास्त होणारी. ही एक मालिकाच तयार झाली. त्यांनी जर्मनी आणि स्वित्र्झलडमध्येही प्रदर्शनांत चित्रं ठेवली होती, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. पण १९२६ मध्ये अमेरिकेत ‘सोसायटी ऑफ इंडिपेंडंट आर्टिस्ट’मध्ये त्यांचं एक पतंगाकृती चित्र दाखवलं गेलं आणि त्यावर समीक्षकांच्या पसंतीचा शिक्का बसला. निओप्लास्टिक शैली हीच मोन्द्रिआनची ओळख ठरली. त्यावर चर्चा घडत गेल्या आणि मग चित्रं भराभर विकली जाऊ लागली. मायदेशी सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या राईक्स म्युझियमने मात्र त्यांनी भेट दिलेलं त्यांचं चित्र साभार परत पाठवलं.
अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये त्यांची चित्रं विकत होती, पण नाझी राजवटीतल्या जर्मनीत त्यांना प्रखर विरोध झाला. दुसऱ्या महायुद्धाची चिन्हे पाहून त्यांनी लंडनला मुक्काम हलवला. इथे स्टुडिओ पांढऱ्याशुभ्र रंगात रंगवून घेतला होता. नाझींनी बॉम्ब टाकून तो ध्वस्त केला. शेजाऱ्यांची घरंही उगीचच बळी पडली म्हणून १९३८ मध्ये त्यांनी न्यू यॉर्कमध्ये जाऊन राहायचं ठरवलं. रंगीबेरंगी, उत्फुल्ल कॅलिडोस्कोपिक चेहऱ्यांचं, अनेक संस्कृतींना सामावून घेणारं न्यू यॉर्क त्यातल्या संगीत आणि जल्लोषामुळे त्यांना खूपच आवडलं. एकंदरीतच युरोपसारखी शिस्तबद्ध वृत्ती नसल्याने इथली स्वच्छंदता त्यांना कलेला पोषक वाटली. इथे त्यांना बार्बरा हेपवर्थ आणि लुईस आर्मस्ट्राँगसारखे कलाकार भेटले आणि त्यांच्या आयुष्याचा चेहरामोहराच बदलला. मोन्द्रिआनचं ‘ब्रॉडवे बूगी-वूगी-४२’ (१२७ ७ १२७ सें. मी. ऑइल ऑन कॅनव्हास- १९४२) हे चित्र म्हणजे एक जॅझमधली सुरावट आहे- आणि चित्रही. यात न्यू यॉर्कमधल्या चौका-चौकांचं चित्र दिसतं. निळ्या-पिवळ्या लाइट्सचा ब्रॉडवे आणि रंगसंगतीतून सूचित होणाऱ्या देहाकृतींच्या नृत्याचे हावभाव. इथे सरळ रेषांची जागा छोटय़ा छोटय़ा रंगीत प्लेन्सनी घेतलेली आहे.. रेषा अखंड राहिलेल्या नाहीत.. रंगांनी मध्ये मध्ये थांबवून पुढे जातात. अखेरच्या चित्रांमध्ये आयताकृती आणि आनंदी रंग यांचा परस्परांशी खेळ दिसतो. नंतरच्या चित्रांत आनंदी रंगांची जागा वाढत जाताना दिसते. रेषा पेंटिंगच्या कॅनव्हासच्या पार, समांतर गेल्यासारख्या. म्हणूनच कदाचित मोन्द्रिआन म्हणत की, एकाग्रतेसाठी चित्राचा पृष्ठभाग सपाट ठेवावा. जर त्याचा वाण, पोत वेगवेगळे ठेवले तर पाहणाऱ्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं. आधुनिक कलेची प्रभावी मांडणी करायची असेल तर मालिका असाव्यात आणि त्यात रंगांची मांडणी आणि वैविध्य असायला हवं, हे त्यांचं स्वानुभवावरून केलेलं विधान मॉनेंच्या ‘वॉटर लिलीज’, सेझाँचे ‘बेदर्स’ किंवा कांदिंस्कीच्या ‘कॉम्पोजिशन’वरून पटण्यासारखंच.
मोन्द्रिआनची चित्रं असोत वा लिखाण- सोप्या वाटणाऱ्या शब्दांत नेमकं बोलून जाणं ही त्यांची हातोटी. आता हेच बघा ना : The problem in art is to achieve the balance between subjective and objective. हे एकच विधान चर्चेचा ऐवज आहे, आणि ती जाणकारांवर सोडलेली बरी!!
arundhati.deosthale@gmail.com