डॉ. आशुतोष जावडेकर
तेजस माहीकडे वळून म्हणाला, ‘‘एवढं चालून झालं की बसू या बाकावर, मग बोल. काहीतरी झालं असणार नक्की; त्याखेरीज तू मला बोलावणार नाहीस. आणि हो, आधीच सांगतो, कधी नव्हे ते बायकोला टिंग्या टाकून मी बाहेर पडलो आहे.’’
माहीचा चेहरा एक क्षण गंभीर झाला. ती म्हणाली, ‘‘येस! तू पळून ये. मी इथे बसते.’’
‘‘एकटी कुठे बसतेस? आत्ता फार लोक नाहीयेत या ट्रॅकवर.’’ तेजस म्हणाला आणि मग ‘‘आळशे, चाल,’’ असं हसत म्हणत तिच्या हाताला खेचून चालायला लागला.
माही हसत म्हणाली, ‘‘हे तुम्हा पुरुषांचं बरं असतं राव! कितीही समानता म्हटली तरी तुम्ही रात्री असे भटकता आणि आम्ही मुली अशा एकटय़ा नाही भटकू शकत. काय मस्त वाटतंय आत्ता इथे. सुंदर लाईट्स आहेत या ट्रॅकवर आणि झाडं काय छान वाऱ्यावर हालत आहेत. आहा! फिलाडेल्फियाला होते तेव्हा तिथल्या पेन स्टुडंट गार्डनमध्ये मी आणि रिकी असे रात्री पळायला जात असू.’’
तेजस झपाझप चालताना पुढे गेलेला तो तिथूनच म्हणाला, ‘‘मग?’’
‘‘मग काय?’’ माही म्हणाली आणि बोलायची थांबली.
तेजस परत आला आणि म्हणाला, ‘‘बोल. काय झालं आहे? का मला भेटायला असं र्अजट बोलावलंस?’’ माही शांत राहिली. ‘‘मी काही विचारायचं आहे, का तूच सांगणार आहेस?’’ तेजसने विचारलं.
माही घुटमळत म्हणाली, ‘‘ऐक. धीरजने मला आज प्रपोज केलं, लग्नासाठी.. आत्ता, संध्याकाळी.’’ तेजस एक क्षण थांबला आणि मग स्वत:ला सावरत पटकन म्हणाला, ‘‘ओ-ओह! अभिनंदन! अभिनंदन!’’
माही हसली आणि तिने विचारलं, ‘‘बसून बोलू या?’’ तेजसने चालण्याची गती वाढवत म्हटलं, ‘‘यात काही चर्चा करण्यासारखं आहे? तुझं लग्न ठरलं तर अखेर. मला आणि अरिनला अंदाज आलाच होता. तेजसचा हात ओढत माहीने कळवळून आणि रागावून म्हटलं, ‘‘तेजस, थांब. बस ना रे इथे बाकडय़ावर. ना माझं लग्न ठरलं आहे, ना मी त्याला काही ‘हो’ किंवा ‘नाही’ सांगितलं आहे. मला एकदम भीती वाटतेय रे. धीरज एकदम असं प्रपोज करेल असं वाटलं नव्हतं मला. म्हणून तुला मघाशी मेसेज केला.’’
तेजस थबकला. ‘‘का, वाटलं नव्हतं तुला तो मागणी घालेल असं? धीरजसोबतचा सेल्फी तू दोन आठवडे डीपी म्हणून लावलास तेव्हा अंदाज तुला नसेल, पण आम्हाला आलेला. जेव्हा आपल्या चॅटमध्ये तू अरिनला चुकून ‘आऱ्या’ म्हणण्याऐवजी ‘धिऱ्या’ असं म्हणालीस तेव्हाही अंदाज आलेला दोघांना. गणपती विसर्जनाच्या वेळेस त्याने तुला जवळ ओढून घेतलं तेव्हा, जेव्हा गीतामावशीने त्याच्याविषयी आमच्याशी बोलताना डोळे मोठ्ठे केलेले तेव्हा, आपण चौघे जेव्हा भेटलो तेव्हा तू जणू मला आणि अरिनला विसरून त्या धीरजशीच बोलत बसलेलीस तेव्हा, मध्ये एकदा तू कारणावाचून हसत सुटलेलीस तेव्हा, त्या अस्मितने तुला लावणी म्हणायला सांगितली आणि तू चक्क डोळे मिटून हसत ‘कर्नाटकी कशिदा’ असं गुणगुणलेलीस तेव्हा, माझ्या बायकोशी अचानक परवा चॅट करून तू लग्न आणि संसारावर तुमची चर्चा वळवल्याचं माझ्या बायकोनं मला सांगितलेलं तेव्हा.. अंदाज आलेला मला, आम्हाला. मग तुला नव्हता आला? प्रेमात आहेस तू यार त्याच्या! दिसतंच आहे ते! आत्ताही बघ तुझा चेहरा! का खेळवणार आहेस त्याला फक्त;आणि म्हणून त्याने मागणी घातल्यावर धक्का बसल्याचा अभिनय करणार आहेस? प्रेम सोपं नसतंच माही आणि बेजबाबदार माणसं जसं र्अधमरुध प्रेम करतात, तसं करणार आहेस का तू?’’
आणि मग एकदम तेजसला मनोमन वाटलं, ‘माही अरिनला आज का भेटली नाही? का त्याच्याशी शेअर केलं नाही हे तिने किंवा तिच्या त्या गीतामावशीशी? व्हाय मी यार? हे टेस्टिंग आहे यार माझं!’ पण तो काही बोलला नाही. माहीचे डोळे एकदम डबडबले. ते बघून तेजसला जाणवलं की, साला, आपण सगळे पुरुष गोंधळ घालतो तसाच गोंधळ आता आपण केला. ताडताड बोलून मोकळे झालो. मग तो गडबडीने म्हणाला, ‘‘सॉरी. माझा बोलण्याचा पीच चुकला. आणि प्रामाणिकपणे कारणही सांगतो. माही, मला तू आवडतेस. ऑफकोर्स, प्रेम म्हणावं एवढी नाही.. आणि ना मला अधिक गुंतायचं आहे तुझ्यात, पण नकळत तुझं लग्न ठरलं म्हणल्यावर मी थोडासा इन्सिक्युअर झालो यार! मला हवी आहेस यार तू मत्रीण म्हणून कायम!’’ एकदम मोकळं झाल्यासारखं तेजसला वाटलं. त्याला वाटलं की हेही एक तऱ्हेचं प्रपोजलच आहे! मत्रीच्या प्रेमाची कबुली आणि मागणी. त्यात अधिक उणं काही नाही. त्यात अशुद्ध आणि हीन असंही काही नाही. सरळ आहे सगळं, निर्मळ आहे.
माहीने त्याचा हात हातात घेऊन म्हटलं, ‘‘आता तरी बस माझ्याशेजारी आणि हा हात सोडू नकोस.’’ तेजस चमकला आणि विसावला. दोन क्षण कुणी काही बोललं नाही. मग तेजसनं विचारलं, ‘‘तुला धीरज आवडतो का? मला वाटतं की तूही प्रेमात आहेस त्याच्या. आता एकदम लग्नाची मागणी ही तुझ्या पिढीला जरा वेगळीच वाटणार. पण आमच्या पिढीसाठी ते स्टॅण्डर्ड आहे!’’
माही हसत म्हणाली, ‘‘हो, ते झालंच. सगळे आधी फक्त ट्राय करू काही महिने असं म्हणतात. धीरज आणि माझी जेमतेम चार महिन्यांची ओळख आहे.’’
‘‘ते मॅटर करत नाही पण..’’ तेजस तिच्या चेहऱ्याकडे थेट बघत म्हणाला आणि मग त्याने विचारलं, ‘‘तुला हे मागचे चार महिने चार वर्षांसारखे वाटतात का?’’ माही उमजून हसली. प्रेमात होतीच ती धीरजच्या. त्याचे धिप्पाड खांदे तिला कवेत घेत असताना तिला वाटलेलं की बस यार! याहून सुख ते काय?
त्याच्या बोलण्यातला विनोद तिला आवडलेला. त्याचा आत्मविश्वास, त्याचा रुबाब, त्याचं ग्रेसफुली तिच्याशी वागणं आणि बोलणं, एकदा ड्रंक झालेला तेव्हाही अगदी अदबीने तिला जवळ ओढून तिचा किस घेणं.. रिकीविषयी एकदा जेव्हा माही त्याला सगळं सांगत होती तेव्हा तो म्हणालेला, ‘‘माय गर्ल, मी तुझ्या तेजस किंवा अरिन या मित्रांसारखा खूप सेन्सिटिव्ह नाही. तुटतं कधीतरी. आणि आठवतात ती माणसं आपल्याला.’’ आणि मग डोळा मारून तो म्हणालेला, ‘‘कधी ऑग्र्याझमिक क्षणी तू ‘रिकी’ म्हणून ओरडलीस तरी मला काही प्रॉब्लेम नसणार आहे!’’ आणि मग तिने तिच्या हातातली बॅग त्याच्या पाठीत मारलेली आणि दोघे हसत बसलेले. तिला आवडला होताच तो. सगळं जग ती विसरत असे एकेकदा त्याच्या नादात..
तेजस तिची तंद्री तोडत म्हणाला, ‘‘निघू या इथून आता. उशीर झाला आहे. तसाही निर्णय तूच घ्यायचा आहेस. माझं मत तू विचारलं नाहीयेस, पण सांगतो. चांगला मुलगा वाटला मला तो. माझ्या माहीला इतपत रुबाबदार नवरा हवाच! चला आता.’’
माही म्हणाली, ‘‘पाच मिनिटे थांबू या ना रे.’’ मग तेजसने यूटय़ूबवरचं एक गाणं लावलं. हेडफोनचा एक प्लग तिच्या कानात घातला, एक त्याच्या. ‘क्रेझी रिच एशिअन’ या चित्रपटातलं एक चर्चमधल्या लग्नाचं गाणं होतं. इतकं सुंदर सजवलेलं चर्च! उत्कट वर आणि वधू. मधल्या पायवाटेतून छोटी मुले फुले हातात घेऊन वेदीपर्यंत चालत येतात. वेदीशेजारी उभी असलेली गायिका अलगद गिटार वाजवत उत्कट गायला सुरुवात करते. वाग्दत्त वधू बाकांमधून रस्ता काढत वरासमोर उभी राहते. तो वचन घेतो पाद्री सांगेल तसं आणि वधूचं चुंबन आवेगाने घेतो. माही ते बघून म्हणाली, ‘‘येस, आय लव्ह धीरज.’’
तेजस म्हणाला, ‘‘रिकी अजून मनात रेंगाळतो आहे तुझ्या. तेवढीच भीती आहे तुला. पुन्हा दुखावलं जाण्याचं भय वाटतंय तुला. बस. त्या ‘इट प्रे लव्ह’ चित्रपटामधलं आपलं लाडकं वाक्य आठव. तो जाणता म्हातारा म्हणतो, ‘‘लीझ, तुला जखम झाली म्हणजे तू काही तरी प्रयत्न केलास. अॅण्ड द ओन्ली वे टू हील इज टू ट्रस्ट. विश्वास ठेव माही धीरजवर.’’
माही शांत बसून राहिली. निर्णय तिलाच घ्यायचा होता. पण मित्र मागे होता, असणार होता. ती तेजसकडे वळून हात धरत म्हणाली, थँक यू मित्रा! तेजसने एकदम त्यांचे हात उंचावत तिच्या हातावर चुंबन दिलं आणि आवेगाने म्हणाला, ‘‘हा माझा पहिला आणि शेवटचा किस तुला.’’ आणि मग उठून पुढे जात चालताना मोठय़ाने वात्रटपणे ओरडला, ‘‘माही, या काऊन्सिलिंग सेशनची फी समज हा किस!’’ मग माहीने मागून दणक्यात ‘‘तेज्या..’’ असं म्हणत त्याच्या पाठीवर तिची बॅग आपटली आणि हसत दोघे आपापल्या दुचाकींवरून आपापल्या मार्गाना लागले तेव्हा ती चर्चमधली गायिका आर्ततेने गात राहिली, ‘लाइक अ रिव्हर फ्लोज्..’ शहाण्या आणि जाणत्यांनी सांगितलं कितीही समजावून तरी प्रेमाच्या नदीत माणसं पोहतातच आणि आभाळभर पसरलेलं बहुरूपी कलंदर प्रेम वारा बनत भूमीनजीक येत माही, तेजस आणि धीरज या तिघांना आर्ततेने एकत्र बांधत गेलं.
ashudentist@gmail.com