जगभरच्या साऱ्या लोकांना जशी संगीताची भाषा उमगते, तशीच सगळ्यांना समजणारी एक नवीन भाषा उदयाला येते आहे. मग तुम्ही मराठीभाषक असा वा मँडरीनभाषक; ही नवी भाषा- चिन्हांची, इमोटीकॉन्सची भाषा- तुम्हाला सारखीच समजणार. हे बघा. त्या चिन्हवलयांकित नवभाषेचं पहिलं अक्षर- विसर्गापुढे हा ठेवलेला कंस आणि त्याकडे तिरकं पाहिलं की दिसणारं चेहऱ्यावरचं हसू. हे ‘स्माइली’चं चिन्ह १९८२ साली जेव्हा स्कॉट फॉलमन या संगणक अभियंत्यानं तयार करून त्या विवक्षित अर्थानं वापरलं तेव्हा त्याला पुढे तीसेक वर्षांत या चिन्हाचा बोलबाला एवढा होणार आहे, किंवा लोकलमध्ये उभं राहिल्या राहिल्या त्या स्माइलींचा सडा माणसं आपापल्या फोनवरून दुसऱ्याच्या फोनवर पाडणार आहेत, इत्यादी अंदाज आले नसावेत! पण केवळ स्माइलीच नव्हे, तर इतरही अनेक चिन्हं आज माणसं व्यवहारात वापरत आहेत. दु:ख, उदासीनता, नैराश्य, गळून जाणं, अश्रुपात, वाईट वाटणं, मनाला लागणं या निरनिराळ्या अर्थच्छटांसाठी एकच ‘सॅड’चं सिम्बॉल आता पुरतं आहे. ‘मी प्रेम करतो’ एवढे तीन शब्दही न वापरता ‘हार्ट’ किंवा ‘किस’चं चिन्ह आता वापरता येतं आणि कशाचंही कौतुक करताना वेळ आणि शब्दांची कमाल बचत करीत माणसं उंचावलेल्या अंगठय़ाचं ‘लाइक’चं चिन्ह पाठवीत आहेत!
आणि म्हणूनच या चिन्हभाषेची समीक्षा होणं हे अत्यंत अगत्याचं आहे. मुदलात ही ‘भाषा’ आहे का? ही चिन्हं भाषेमधल्या शब्दांचा संकोच करीत आहेत का? या चिन्हांमुळे जगभरच्या भाषा संकटात येतील का? की उलट या चिन्हांमुळे भाषेला पूरक असं अभिव्यक्त होण्याचं नवं साधन मिळालं आहे?.. हे आणि असे अनेक प्रश्न सध्या स्माइलीकडे बघता बघता मला पडत आहेत. केवळ भाषिक समीक्षाच नव्हे, तर नव्या, उगवत्या साहित्यामध्ये ही चिन्हभाषा असणार आहे का? असल्यास कशी? साहित्याला ती चिन्हं मदत करतील की अडसर ठरतील? या चिन्हांचे संदर्भ तर आता नव्या साहित्यात पदोपदी येताहेत. श्रुती आवटे किंवा गणेश मतकरी यांच्या कादंबऱ्यांमध्ये या चिन्हांचं स्वत:चं असं स्थान आहे. ‘खिडक्या अध्र्या उघडय़ा’चा शेवट हा त्या स्माइलीच्या प्रत्युत्तराने व्यामिश्र झाला आहे. ही नवी चिन्हभाषा तिच्यासमवेत असे सारे मुद्दे घेऊन नेट-तलावर अवतरली आहे!
लाइक्स् आणि लेखन
जगभरच्या साऱ्या लोकांना जशी संगीताची भाषा उमगते, तशीच सगळ्यांना समजणारी एक नवीन भाषा उदयाला येते आहे. मग तुम्ही मराठीभाषक असा वा मँडरीनभाषक; ही नवी भाषा- चिन्हांची, इमोटीकॉन्सची भाषा- तुम्हाला सारखीच समजणार. हे बघा. त्या चिन्हवलयांकित नवभाषेचं पहिलं अक्षर- विसर्गापुढे हा ठेवलेला कंस आणि त्याकडे तिरकं पाहिलं की दिसणारं चेहऱ्यावरचं हसू. हे ‘स्माइली’चं चिन्ह १९८२ साली […]
Written by डॉ. आशुतोष जावडेकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-04-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व ‘वा!’ म्हणताना.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Likes and writing