परवा परवाची गोष्ट! मी एका कंपनीत काही माहिती मिळवायला गेले होते. मी वाट पाहत बसले होते. माझी तिथल्या माहिती विभागाच्या कोणाबरोबर तरी गाठभेठ ठरली होती. ठरल्या वेळी बाहेर आली शेलाटी, हसऱ्या lok03डोळ्यांची.. ‘‘हाय, माझं नाव पॅट!’’ तिनं ‘शेकहँड’साठी हात पुढे केला आणि एकदमच आम्ही दोघी एकमेकींकडे पाहत म्हणालो, ‘‘ओ, हाय! व्हाट आर यू डुइंग हीअर?’’ आणि मग आम्ही एकमेंकींना मिठीच मारली आनंदाने!
मला तब्बल पाच वर्षांनी पॅट भेटली अशी अनपेक्षितपणे! माझ्या मनात आठवणी जाग्या झाल्या! खरं तर अलंकारिक भाषेत ‘आठवणींचे जलतरंग’ उमटले! मी पाहिल्याक्षणी तिला ओळखलं नाही. कारण मी पूर्वी तिला फक्त पोहोण्याच्या कपडय़ात पाहिलं होतं! शर्ट-पँटमध्ये पाहिलं नव्हतं फारसं!
गेल्या पाच काय, खरं तर आठ वर्षांत पॅट फारशी बदलली नव्हती. हो. आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. घाईघाईत काहीतरी करताना धडपडले आणि गुडघा दुखावला. डॉक्टरांनी निदान केलं-‘मिनिस्कस फाटलं!’ आता ‘मिनिस्कस’ नावाचा अवयव मी कधी ऐकलाच नव्हता. पण गुडघ्याच्या सांध्यात ‘डोनट’च्या आकाराचा हा स्नायू असतो खरा! मग व्हायचे ते सगळे ‘सर्जनी’ सोपस्कार झाल्यावर कोणीतरी मला सुचवलं, ‘वॉटर थिरपी’ घे.. चांगली तुझ्या गुडघ्याला.’’ ‘. ट. उ. अ.’ नावाच्या संस्थेत पोहण्याचा तलाव असतो आणि तिथे ‘वॉटर अ‍ॅरोबिक्स’चे क्लासेस असतात हे समजल्यावर मी घराजवळच्या ‘. ट. उ. अ.’मध्ये नाव नोंदवलं. सकाळी सातपासून हे ‘जल’द व्यायामाचे वर्ग होते. मला सोयीची वेळ- तास झाल्यावर परस्पर कामाला जाणं वेळेत बसलं. आणि त्यानंतर तब्बल तीन वर्षे मी पॅटच्या तासाला जात राहिले. माझा पायच नव्हे, तर फार वेळ बसून बसून कुरकुरणारी पाठही सरळ झाली!
शास्त्रीय परिभाषेत नाही, पण साध्या शब्दात सांगायचं तर घामाघूम होण्यापर्यंत दमवणारा व्यायाम म्हणजे ‘अ‍ॅरोबिक’ होय. त्यात हृदयाचे ठोके जलद पडतात, वगैरे! उडय़ा, पळणे असं काही काही! जे ‘स्थळी’ ते ‘जळी’- म्हणजे पाण्यात केलं की त्याला ‘वॉटर अ‍ॅरोबिक्स’ म्हणजे ‘जल’द व्यायाम म्हणायचं. जलोपचारांतला हा ‘जल’द उपचार म्हणायचा. ‘पाणी’ म्हणजे जादूगार.. किमयागार! हृदयाचे ठोके न वाढता, फारसं घामाघूम न करता हृदयाचा रक्तपुरवठा वाढवणारा, कॅलरीचा साठा जाळणारा व्यायाम पाण्याच्या अनोख्या जादूमुळे करता येतो. हा व्यायाम कमरेइतक्या पाण्यात उभं राहून करता येतो. पोहणे येण्याची आवश्यकता नसते. पाण्यात वस्तूला उचलून धरण्याची किमया आणि (बॉयन्सी- इ४८ंल्लू८) तरीही हालचालींना विरोध करण्याची जोरकसता एकाच वेळी! त्यामुळे स्नायूंची ताकद वाढते. शरीराचा तोल सांभाळण्याचं कौशल्य वाढतं. हात-पाय-मेंदूचं सांघिक काम सुधारतं. स्नायूंची लवचिकता वाढते- आणि आरामही! शिवाय हाडं बळकटीला मदत होते. पाण्यातून बाहेर पडल्यावर शरीर आणि मन हलकं, ताजं, टवटवीत होतं. स्नायूंच्या वेदना शमतात.
पाण्यात पडण्याची भीती नसते आणि इ४८ंल्लू८ मुळे लठ्ठ माणसालाही हालचाल सोपी वाटते. थोडक्यात, ‘एका दगडात थवा’ किंवा ‘एका खडय़ात अनेक जलतरंग’ म्हणायला हरकत नाही.
त्यामुळेच की काय, जलोपचार, जलदोपचार ‘योगा’ आणि ‘ताय ची’ (ळं्र उँ्र) हा प्रकार या सर्वावर ‘अमेरिकन आथ्र्रायटिस फाऊंडेशन’ या संस्थेने, अस्थिरोगतज्ज्ञांनी आणि मज्जासंस्थातज्ज्ञ (न्यूरो सर्जन्स) यांनी आशीर्वादाचे शिक्कामोर्तब केले आहे. पाण्यातल्या योगासनांना ‘जलयोग’ (वॉटर योगा) आणि पाण्यातल्या ‘ताय ची’ला ‘अ्र उँ्र’ म्हणतात. पार्किन्सन्स म्हणजे कंपवात, मल्टिपल स्केरॉसिस हा मज्जासंस्था/स्नायूंचा आजार, स्ट्रोक-म्हणजे अर्धागासारखे प्रकार, हाडेमोडी आणि अनेक प्रकारच्या अपघाती दुखापती या सर्वासाठी
हे जलोपचार आणि व्यायाम असतात.
२००८ मध्ये अमेरिकन आरोग्य खात्याने या सर्व फायद्यांत आणखी काही नोंदींची भर घातली- ‘जलदोपचाराने रक्तदाब म्हणजे ‘ब्लड प्रेशर’ कमी होऊ शकते.. शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त वाढणारे ‘लॅक्टिक अ‍ॅसिड’ कमी होण्यास मदत होते.
एकंदरीत या ‘आखूड शिंगी, बहुगुणी, बहात्तर रोगांवर अक्सीर इलाज’ इ. उपचारांबद्दल मला काहीही माहिती नसतानाही मी तीन वर्षे पाण्यात डुंबून मजा केली ती ‘पॅट’मुळे! ही माहिती मला समजली तीही पॅटमुळे. आणि त्याहीपूर्वी मी काही फायदे अनुभवले ते तिच्याचमुळे! शिवाय मला ४०-५० नवीन मैत्रिणी मिळाल्या, ही पाणी आणि ‘जलतरंग’ उमटवणाऱ्या पॅटचीच देणगी! सकाळी सात ते आठचा तास. पॅट येते ती किलबिलत, हातात ‘बूम बॉक्स’ म्हणजे गाणं वाजवणारी कोणतीतरी पेटी घेऊन! (सी. डी. प्लेअर- कॅसेट प्लेअर.. असलं काही!) पाण्यात चाळीसेक विविध वयाचे, आकारांचे विद्यार्थी! पॅट पाण्यात उतरून आधी हातापायांचे व्यायाम करायला लावते. मग सरळ सांघिक कवायतींचे प्रकार! हास्यविनोद, गप्पा.. आणि एक साथ- वन् अँड टू अँड.. अशा सूचना. तास कसा संपतो ते समजत नाही. प्रत्येकीला ती नावानं ओळखते. कोणी आलं नाही की ‘बरी आहेस ना?’ म्हणून फोन करून चौकशी! दरमहा वाढदिवस साजरे. तास संपल्यावर सर्वानी (कुडकुडत) एका खोलीत जमून केक कापायचा. कोणी खाऊ करून आणत, तो वाटून खायचा- मजा करत! आमच्या वर्गातल्या सर्वात मोठय़ा- म्हणजे ९० वर्षांच्या बाईचा वाढदिवस साजरा करताना विशेष मजा! तेव्हा पॅटचं वय समजलं- ६८ वर्षे!
तलावातलं पाणी कोमट असतं. पाण्यात शिरताना फार बिचकावं लागत नाही. क्लोरिनमुळे आमचे ‘स्विम सूट्स’ म्हणजे ‘जल’कपडे फार ‘जल’द फाटून (दोन महिन्यांत) जात. बाजारात स्वस्त ‘सूट’ आले की सगळ्या एकमेकींना वार्ता देत.
तास संपल्यावर आंघोळीचा हमामखाना सार्वजनिक! एका खोलीत २५ शॉवर्स टांगलेले! अपंग, सुरकुत्यांचं जाळं असलेल्या, काही थुलथुलीत, काही शस्त्रक्रियांचे ओरखडे अंगावर वागवत.. सर्व प्रकारच्या स्त्रिया- माणसांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. धडधाकट शरीराचं वरदान मिळाल्यानं भाग्यवान वाटू लागलं. ‘अनुकंपा’, ‘कृतज्ञता’ या शब्दांचे अर्थ जरासे समजू लागले.
अपंग लोकांना तलावात उतरण्यासाठी यांत्रिक खुर्चीची सोय असते. एकदा त्यावरून एक २५ वर्षांची मुलगी खाली उतरवली. बरोबर तिची आई. मुलीला धड बोलता येत नव्हतं. पाण्यात काहीही करणं तिला कठीण होते. त्यामुळे विषण्ण होऊन, अगतिकपणे ती चिडचीड करत होती. दोन महिन्यांनी तिला एखादी गोष्ट जमू लागली तेव्हा तिनं तिच्या परीनं हसून तो आनंद साजरा केला. आम्ही सर्वानी उत्साहानं टाळय़ा वाजवल्या. घरात एकटी असताना ही हसतीखेळती मुलगी धडपडली आणि डोक्यावर आपटली. ‘९११’ या फोनसेवेला फोन करण्यासाठी ती उठू शकली नाही. वेळीच मदत मिळाली नाही. परिणामी मेंदूला रक्तपुरवठा मिळाला नाही.. किंवा असंच काही. मुलगी लुळीपांगळी झाली! तिची कथा ऐकताना हळहळ वाटली. अशा अनेक गोष्टी.. आमचं सर्वाचं एक कुटुंब झालं होतं!
त्या पाण्यानं तीन वर्षांत मला नुसतंच बरं केलं नाही, तर ‘जीवन’गाणं शिकवलं! नंतर आम्ही घर बदललं आणि माझा तो ‘जीवन’बंध सुटला. परवा पॅट भेटली आणि ते सगळे ‘जलतरंग’ मनात उमटले!                                                                             

Pimpri, entrepreneur , LBT ,
पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Employee Stress , App , Pune Municipal corporation ,
कर्मचाऱ्यांच्या ताणावर ॲपची मात्रा ! पुणे महापालिका प्रशासनाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव
Chandrapur district bank recruitment
चंद्रपूर : जिल्हा बँक नोकर भरती; खासगी बाऊन्सर लावून मुलाखती अन्‌‌ शंभर कोटींचा…
selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
Parli Sarpanch accident shiv sena ubt group
Beed Crime: ‘बीड जिल्हा केंद्रशासित प्रदेश करा’, सरपंचाच्या अपघातानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
Story img Loader