विजेंदरसिंग धावण्याचं प्रशिक्षण देतात. बलबीर टिक्की एकदा अचानक विजेंदरसिंग यांच्यासमोर खोसला शाळेच्या मदानात जाऊन उभा राहिला.
‘‘मला ऑलिम्पिक स्पर्धामध्ये शंभर, दोनशे, आठशे मीटर स्पर्धामध्ये भाग घेऊन भारताला या प्रकारांत सुवर्णपदके मिळवून द्यायची आहेत.’’ बलबीर.
विजेंदरसिंग बलबीरकडे पाहातच राहिले.
‘‘कॉलेजमध्ये असताना धावण्याच्या स्पर्धामध्ये कधी विजेता ठरला आहेस का?’’ विजेंदरसिंग.
‘‘मी कधी भागच घेतला नव्हता, मग विजेता कसा ठरणार?’’ बलबीर.
‘‘बाळा, आधी शालेय शर्यतीत भाग घे. त्या लहान मुलांच्या शर्यतीत पहिला ये. मग माझ्याकडे ये.’’ विजेंदरसिंग कुत्सितपणे म्हणाले.
‘‘मी सविताला शंभर मीटर स्पध्रेत हरवलं तर तुम्ही मला मार्गदर्शन कराल का?’’
‘‘वा! उचलली जीभ की लावली टाळ्याला. इतकं सोपं आहे का ते?’’ विजेंदरसिंग सविताकडे वळाले.
‘‘सर, मी तुम्हाला विनंती करतो की, एकदा तुम्ही मला संधी देऊन तर पाहा.’’
‘‘अरे, तुझ्या पायात साध्या चपला आहेत. रिनगकरिता स्पाईक्स असलेले स्पोर्ट्स शूजसुद्धा नाहीत. मग तू काय बरोबरी करणार सविताची!’’ विजेंदरसिंग.
‘‘पण सर .. ’’ बलबीर.
विजेंदर आता बलबीरकडे दुर्लक्ष करून सविताला शंभर मीटरचा सराव देण्यावर लक्ष केंद्रित करू लागले. सवितानं ट्रॅकवर पोझिशन घेतली. शेजारच्याच ट्रॅकवर बलबीरनंही पोझिशन घेतली. स्टार्ट म्हटल्यावर पायातल्या चपला काढून बलबीरनंही पळायला सुरुवात केली. पायातल्या चपला काढून टाकण्यात बलबीरचा थोडासा वेळ गेला. पण तो वेळ भरून काढत त्यानं जोरदार मुसंडी मारली. शंभर मीटर अंतर बलबीरनं तोडलं तेव्हा सविता सुमारे १५ मीटर मागे पडली होती. विजेंदरसिंग, सविता आणि ट्रॅकवर तसंच ग्राऊंडवर असलेल्या कुणाचाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
पुन्हा एकदा बलबीरची परीक्षा घ्यायचं विजेंदरनं ठरवलं. बलबीर आणि सविता दोघांनीही शेजार- शेजारच्या ट्रॅकवर पोझिशन्स घेतल्या. विजेंदरनं ‘गेट सेट गो’ म्हटल्यावर दोघंही उधळले. बलबीरनं अंतिम रेषा ओलांडली तेव्हा सविता २० मीटरपेक्षा जास्त मागे पडली होती. अजूनही विजेंदरचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे आक्रीत घडलं कसं याचाच तो विचार करत होता. बलबीरनं दिलेली वेळ फक्त सात सेकंद होती. जागतिक रेकॉर्ड आठ सेकंदांच्या पुढचं होतं.
‘‘तुझं नाव काय? काय करतोस?’’ विजेंदरसिंगनं विचारलं.
‘‘मी बलबीर टिक्की.’’
‘‘म्हणजे इथं पी.एस.आय. म्हणून नुकताच बदलून आलेला बलबीर टिक्की?’’
‘‘ यस् सर.’’ विनम्रपणे बलबीर म्हणाला.
‘‘शाब्बास बलबीरजी. पोट सुटल्यावरही तुम्ही एवढय़ा तयारीचे असाल असं वाटलं नव्हतं. तुम्हाला सराव नाही, प्रशिक्षण नाही, अॅथेलिट बॉडी नाही, तरीही एवढी तयारी आहे. मग या सगळ्या गोष्टी उपलब्ध झाल्यावर काय कराल, काही सांगता येत नाही.’’
‘‘सर, मी इथे समोरच्याच बंगल्यात राहतो. तुमचा पठ्ठय़ा बनून िस्पट्रर म्हणून नाव कमवायची इच्छा आहे. समोरच राहात असल्यानं सकाळीच फिरायला बाहेर पडलो होतो. तुम्ही दिसलात इथं, म्हटलं तुम्हाला भेटावं.’’ बलबीर.
‘‘ओ.के. उद्यापासून सकाळ-संध्याकाळ नियमित या सरावाला.’’
‘‘ सर, संध्याकाळचं काही नक्की नसतं. पण सकाळी मात्र वेळेवर येत जाईन.’’
बलबीरला तरुण मित्रा या डॉक्टरची आठवण येत होती. त्याच्या उपद्व्यापांमुळेच आज तो सविताला मोठय़ा अंतराने मागे टाकू शकला.
बलबीरनं एमएस्सीनंतर पीएसआय बनायचं ठरवलं होतं. एमएस्सीनंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन तो पीएसआय बनला. ‘एमपीए’मधलं प्रशिक्षण संपवून इथं पोिस्टग झालं.
एकदा त्याची पंचाईतच झाली. त्याच्या डॉग स्कॉडमधली दोन्ही कुत्री अचानक मेली. माग काढणं अवघड झालं. काय करावं, असा प्रश्नच पडला. नवीन कुत्री घेतली तरी त्यांना प्रशिक्षण दिल्यावरच त्यांचा उपयोग होणार होता.
विचारात गर्क असलेला बलबीर क्लबमध्ये आला.
‘‘हाय बलबीर. हाऊ आर यू?’’ तरुण.
‘‘भंकस बॉस. काय करू, जाम सुचत नाय.’’ पत्ते पिसत बलबीर म्हणाला.
‘‘अरे, क्या हो गया है यार?’’ डॉ. तरुण.
इतक्यात आणखी दोन ब्रीज पार्टनर्स आले. एक व्हेट सर्जन अय्यंगार होते, तर दुसरे सीनियर पी.आय. कोरडे होते. बलबीरनं पिसलेले पत्ते टेबलावर ठेवले. प्रत्येकानं एक कार्ड काढून उघडं केलं. ब्रीज पार्टनर्स ठरले. बलबीर आणि सीनियर पी.आय. कोरडे ही जोडी ठरली. बलबीरलाच पिसावं लागलं.
‘‘आज बलबीरचा मूड चांगला नाही.’’ तरुण.
‘‘काय झालं रे बलबीर?’’ कोरडे.
‘‘सर, आपल्या डॉग स्कॉडमधली दोन्ही कुत्री अचानक मेली. चोराचा माग काढणं अवघड झालंय. काय करावं, असा प्रश्नच पडला. नवीन कुत्री घेतली तरी त्यांना प्रशिक्षण दिल्याशिवाय त्यांचा काय उपयोग होणार?’’ पत्ते वाटत बलबीर म्हणाला.
‘‘वन क्लब.’’ पत्ते पाहून बलबीरनं कॉल दिला.
‘‘इन कुत्तो की स्पेशालिटी होती है. त्यांना एखाद्या वस्तूचा वास दिला की, त्या वस्तूचा मालक रस्त्यावरून चालत कितीही अंतर गेला असला तरी त्याचा माग काढत जातो. माणूस शोधून त्या माणसावर कुत्रा झेप घेतो.’’ व्हेट सर्जन अय्यंगार.
‘‘त्यांच्या ग्लायल सेल्स हे कार्य करतात.’’ तरुण.
‘‘ग्लायल सेल्स ही काय भानगड आहे?’’ बलबीर.
‘‘बलबीर तेरा वन क्लब है ना? माय कॉल इज पास.’’ अय्यंगार.
‘‘थ्री स्पेडस्.’’ कोरडे.
‘‘फोर स्पेडस्.’’ बलबीर.
‘‘अरे थांब. तरुणला कॉल द्यायचा असला तर?’’
‘‘येस. मेरा कॉल है पास.’’ डॉ. तरुण, ‘‘मेंदूच्या कार्यात ग्लायल सेल्स, त्यातही अॅस्ट्रोसाइटस्ची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे गेल्या काही वर्षांमध्ये शास्त्रज्ञांना उमगलं आहे.’’
‘‘भई तरुण, ये बॉल कंधोके उपरसे गया है. अंपायर के नाते म वॉìनग देना चाहता हू.’’ बलबीरच्या या वाक्यावर चांगलीच खसखस पिकली.
‘‘मानवेतर प्राण्यांमध्ये अॅस्ट्रोसाइटस् संख्येने कमी असून त्यांच्यात वैविध्य नसतं. मानवात मात्र ते विपुल असतात.’’ तरुण.
‘‘पण आज मेंदू, न्युरॉन्स, ग्लायल सेल्स आणि अॅस्ट्रोसाइटसचा इथं तास का बरं घेतोस?’’ चहाचा सिप घेत कोरडे.
‘‘बलबीरच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी.’’ बिस्किटचा तुकडा तोडत तरुण.
‘‘बलबीरच्या समस्येवर तोडगा? तो कसा काय?’’ अय्यंगार.
‘‘कुत्र्याच्या मेंदूतल्या ग्लायल सेल्स काढून एका साध्या इंजेक्शनद्वारे बलबीरच्या मेंदूत सोडल्या तर तो वास घेणे, माग काढणे हे काम करू शकेल.’’ तरुण.
‘‘चहासुद्धा चढू शकतो हे आजच पाहात आहे.’’ कोरडे. ‘‘अरे, हे गुणधर्म डीएनएमुळे ठरतात ना?’’
‘‘सर, माणसाच्या मेंदूतल्या अशा ग्लायल सेल्स कुत्र्याच्या मेंदूत, उंदराच्या मेंदूत इंजेक्ट केल्या, तर त्यांच्या वर्तणुकीत फरक पडतो. मग उलट केलं, म्हणजे कुत्र्याच्या मेंदूतल्या ग्लायल सेल्स माणसाच्या मेंदूत सोडल्या तर असा बदल मानवातही होईल.’’ तरुण.
‘‘वा: म्हणजे आमचा बलबीर.. ’’
‘‘नाही, नाही कोरडेसाहेब. बलबीर गिनिपिग नाही. त्याची इच्छा असली तर.. ’’ तरुण.
यंग अन् धाडसी बलबीर चटकन तयारही झाला.
परिणाम?
वास घेऊन माग काढण्याच्या कुत्र्याच्या गुणधर्मानं बलबीरला हुलकावणीच दिली.
पण ..
ताशी ७०-८० किलोमीटर पळण्याच्या गुणधर्माला मात्र गवसणी घातली.
-अमृता पुराणिक
amruta.barde@gmail.com