डॉ. आशुतोष जावडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रेळेकाकांनी कपाट उघडून ‘कनुप्रिया’ हे पुस्तक शोधून काढलं आणि मग चहा घेता घेता त्या कविता ते निवांत लयीत वाचू लागले. कनु आणि प्रियाच्या- अर्थात कान्हा आणि राधेच्या त्या अद्वितीय कविता. धर्मवीर भारती यांच्या अजोड शैलीतल्या. तेजसने जेव्हापासून त्यांना माहीच्या ब्रेकअपविषयी सांगितलेलं तेव्हापासून त्यांना हे पुस्तक पुन्हा वाचावंसं वाटलेलं. नाही, माहीचा कुणी प्रियकर नव्हता. पण शाळेपासूनच्या मत्रिणीशी तिचं फाटलेलं. आणि आता सरतेशेवटी तुटलेलं. ब्रेकअप काही प्रियकर-प्रेयसी यांच्यामधलाच पाहिजे असं थोडंच आहे? मित्र-मित्र, मत्रीण-मत्रीण, भाऊ- बहीण, भावंडं-चुलते, पालक-मुलं, आजोबा- नातवंडं असं कुणामध्येही ब्रेकअप होऊ शकतंच. रेळेकाकांनीही त्यांच्या आयुष्यात कमी ‘ब्रेकअप’ पाहिलेले नव्हते. रेळेकाका वाचू लागले.. ‘कनु, त्यावेळी तू मला पुकारलं होतंस ना? लो, मैं सब छोडछाड कर आ गयी!’ त्यांनी एक सुस्कारा सोडला, त्या पानाचा फोटो काढला आणि तेजसला ठरल्याप्रमाणे व्हाट्सअॅपवरती पाठवला.
तेजस तेव्हा पोचला होता अरिनकडे. आज त्याच्या रूमवर भेटायचं ठरलं होतं. काहीसं अचानक. अरिनने फोन करून सांगितलेलं- ‘‘तेजसदा, आज भेटू.. माहीसाठी. ती खूप टेन्स दिसते आहे.’’ आणि मग पटकन् भेटण्याच्या दृष्टीने अरिनची रूम दोघांच्या घरांच्या मधे पडत असल्याने तिथे भेटायचं ठरलेलं. अरिनने तेवढय़ा वेळात रूम पार्टनर असलेल्या अहमदनगरच्या चंट पोराला- अस्मितला खाऊ आणायला पिटाळलेलं. आणि हॉलमधला पसारा आवरायला घेतलेला. गाद्या उचललेल्या होत्या. पण दोघांचे कपडे मात्र सर्वत्र पहुडले होते. कोपऱ्यात बीअरची रिकामी बाटली पडली होती. बेल वाजली तसा त्याने टीव्हीशेजारी पडलेला तीन फ्लेवरवाला पॅक उचलला आणि बाथरूममध्ये घाईत फेकला! आणि ते एक बरं झालं, कारण माहीच पहिली खोलीत प्रवेशली! ती हसली तरी थोडी उदास आहे हे अरिनने ओळखलं. पण मग तो तिला पाणी आणण्यासाठी आत गेला. तोवर माहीने कुतूहलाने त्याची खोली निरखली.
तिची पेनसिल्व्हानियामधली खोलीही अशीच छोटी होती. पण असा अबब पसारा तिचा कधीच नव्हता. तिचं लक्ष पहिलं गेलं ते दारामागच्या बुटांकडे. राहणारे पुरुष दोघेच; पण निदान पंचवीस बुटांच्या जोडय़ा तिथे कोपऱ्यात पडलेल्या होत्या! मग तिने कुलर, टीव्ही, पडदा, सोफ्याच्या कोपऱ्यात बहुधा आत्ताच घाईत लपवलेली अंडरवेअर.. हे सगळं खास ‘स्त्री-चाणाक्ष नजरे’ने टिपून घेतलं. तोवर अरिन आला आणि मागून तेजसही आला. तिघे हसले आणि एक चमत्कारिक शांतता पसरली.
अरिन म्हणाला, ‘‘माही, बोल. काय झालं? तू का एवढी अपसेट आहेस? होतात गं ब्रेकअप. आणि मिळतात नवे मित्र-मत्रिणी! बीसाइड्स, तुझा तो बॉयफ्रेंड तर नव्हता! शाळेपासूनची मत्रीण.. हो ना? ठीक आहे यार! लाइक कम ऑन! चीअर अप!’’ ती काही बोलली नाही. तिच्या डोळ्यांत अलगद पाणी आलं. तेजसने अरिनला खूण केली गप्प बसायची. तेजस खाकरत म्हणाला, ‘‘माही, मी समजू शकतो.. मत्र तुटलं की वाईट वाटतंच. तू मला सगळं सांगितलं आहेसच. मला वाटतं की आता काही साध्य होणार नाही. तुटलं एक नातं- असं तू स्वत:शी कबूल कर.’’ माही अरिन आणि तेजस दोघांचे चेहरे टाळत म्हणाली, ‘‘मेसेजला रिप्लाय नाही, फोनला उत्तर नाही, म्हणून शेवटी इगो गिळत घरी गेले तिच्या. तिने चहा दिला आणि म्हणाली की, आता संपलंय आपलं नातं. असंही पुढे म्हणाली, की तिला मी फोन करू नये. उबरमध्ये बसून घरी आले तेव्हा मलाही जाणवलं, की खरंच, संपलं आहे हे मत्रीचं नातं! संपलंय..’’
एक क्षण थांबून अरिन त्वेषाने बोलला, ‘‘जस्ट लूक अॅट यू! काहीच संपलं नाहीये! ती थांबलीय तुझ्या डोळ्यांत. प्लीज, एकदाच.. वन्स अॅण्ड फॉर ऑल.. तिला बाहेर काढ तुझ्यातून!’’ माही अरिनच्या त्वेषामागचं प्रेम ओळखत मनातच उत्तरली- ‘‘असं करता आलं असतं तर बोधिसत्वच झाले असते अरिन!’’ अमेरिकेतल्या तिच्या खोलीत तिने पद्मपाणी बुद्धाची अजंठय़ामधली सुंदर प्रतिमा फ्रेम करून लावलेली. कमळाचं पान हातात घेत त्रिभंग स्थितीत कमरेत वाकून उभा राहिलेला अवलोकितेश्वर! माहीने समोरच्या भिंतीकडे सहज पाहिलं. अरिनच्या भिंतीवर ‘कोल्डप्ले’ या रॉक कंपूचं पोस्टर लावलं होतं. सर्व भावभावनांच्या जिवंतपणाचं, ओढ आणि गुरफटत जाण्याचं प्रतीक जणू! बुद्धाला थेट काँट्रास्ट! माहीने डोळे पुसत म्हटलं, ‘‘आता मी ओके आहे दोस्तांनो! तुमच्याशी एकदा हे शेअर केलं. बस!’’ आणि मग पुढे अरिनला म्हणाली, ‘‘कोल्डप्ले नुसताच भिंतीवर आहे का आवाजही घुमणार आहे आता?’’
हसत अरिनने खूण ओळखून सणसणीत आवाजात गाणं लावलं. ‘व्हॉट इफ’ नावाचं ते गाणं सुंदर गिटारचा शिडकावा करत त्या खोलीत अवतरलं. तेजसने शब्द नीट ऐकले- ‘That you don’t want me there by your side..’
एकाएकी आपण कुणाला जवळ नको असतो ही भावना त्रास तर देतेच. त्याचा कधी ब्रेकअप झालेला बरं? ब्रेकअप तरी त्याला म्हणायचं का? त्याला ती आठवली. लग्नाआधी ऑफिसच्या नव्याकोऱ्या दिवसांत मागच्या डेस्कवर बसणारी. त्याच्या पिढीला साजेल एवढेच ते गुंतले होते. एक-दोन सिनेमे, चार-पाच वेळेला कॉफी-हॉटेल आणि दुचाकीवर होणारे निसटते स्पर्श. आज अरिनची पिढी जशी पहिल्या भेटीतही कोपच्यात जाऊन इंटेन्सली लीप किस करू शकते, तसं तेव्हा शक्यच नव्हतं. पण एकदा मात्र त्याने अलगद चुंबन घेतलेलं तिचं. चारेक दिवसांनी ती म्हणाली होती की, ‘‘माझ्या घरी चालणार नाहीये. आपण नको भेटू या.’’ आणि मग ते संपलं. कायमचंच. का? माहीत नाही! तेव्हा थोडंसं दुखलंच होतं. पण नंतर जाणवत राहिलं, की न कळू देता कुणीतरी शांतपणे मनापार सुरा रोवला आहे! ..ब्रेकअपच होता तो!
‘‘हे घ्या सामोसे आणि कोकाकोला..’’ नुकताच परतलेला अस्मित उत्साहात म्हणाला. त्याची एव्हाना माही आणि तेजसशी बरीच ओळख झालेली. एकूण ठंडा नूर बघून तो म्हणाला, ‘‘आयला! डेड बॉडी घरी आणल्यागत काय गप्प आहात सगळे!’’ आणि त्या कहर वाक्याने सगळे नकळत थोडे हसले. मग विषय कळल्यावर हात हनुवटीवर फिरवत तो बोलला, ‘‘आमच्याकडे कोंबडे भांडायला लागले की आम्ही त्यांना वेगळं ठेवतो. पण त्याआधी ओरखडे येईस्तोवर भांडू, ओरबाडू देतो! शक्ती येते म्हणतात त्याने!’’ माही अरिनला म्हणाली, ‘‘ए पार्ला, हा तुझा अहमदनगर दोस्त हिट् आहे काय!’’ खूश होऊन अस्मित पुढे म्हणाला, ‘‘ताई, आता हँडसम पकावाला पोरगा शोधून लगीनच करून टाका. कसलं ब्रेकअप नि कसलं काय!’’ मग मात्र माही हसत म्हणाली, ‘‘चला! आवरा! निघा!’’
..आणि मग तिघे सामोसा-कोकाकोला आनंदात खाऊन परत निघाले. वाटेत सिग्नलनंतर तेजसने कार थांबवून पानवाल्याकडून बऱ्याच दिवसांनी एक सिगरेट घेतली आणि शिलगावली. फोनवरचा रेळेकाकांचा कविता-फोटो त्याने मग धूर सोडताना ग्रुपवर फॉरवर्ड केला. अरिन तोवर टॉयलेटमध्ये गेलेला. तिथेच मेसेज वाचून त्यानं टाइपलं- ‘राधा आणि कृष्णाचा ब्रेकअप झाला होता? की नव्हता?’ ‘मान लो की मेरी तन्मयता के गहरे क्षण अर्थहीन शब्द थे.. तो सार्थक फिर क्या है कनु?’ या ओळी वाचून आणि त्याला एकदम समोरच्या शेल्फवर मगाशी फेकलेलं काँडोमचं पाकीट बघताना जाणवलं, की यापैकी कुठलाही फ्लेवर वापरून रात्री जवळीक साधली तरी हे असे तन्मय, गहिरे क्षण आपल्या वाटय़ाला अद्याप आलेले नाहीत! हे काहीतरी वेगळं दिसतंय. तिकडे घरी पोचलेल्या माहीने मुळीच हुंदका येऊ न देता पुढची राधेची ओळ तोवर वाचली- ‘अर्जुन की तरह कभी मुझे भी समझा दो, सार्थकता है क्या बन्धु?’ आणि तोवर तेजसने लिहिलेलं- ‘सार्थकता तर कशात आहे माहीत नाही; पण आपण आहोत एकमेकांना! तेही झकास आहे यार!’ आणि मग ग्रुपवर चौफेर हृदय-चिन्हांची अखंडित आरास लागली!
ashudentist@gmail.com