कुलवंतसिंग कोहली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘‘दादा, आप मुझे बार बार बुढे लोगों के रोल देते हो।’’
‘‘तो क्या हुआ हरी? तुला फक्त काम करायचंय. भूमिका कोणती, हे महत्त्वाचं नाही. ती तू कशी निभावणार आहेस, हे जास्त महत्त्वाचं!’’
‘‘पण दादा, ऐन तारुण्यात मला लोक म्हातारा समजतील ना!’’
‘‘देख हरी, जो मिल रहा है, उसी को निभाना पडता है। मला माहिती आहे की तू तरुण आहेस. पण मला हेही माहिती आहे, की तुला कोणतीही भूमिका द्या, तू ती उत्तमच वठवशील. तेव्हा आता शांतपणे काम कर. उद्या तू मोठा कलाकार होशील; त्यावेळी एका चित्रपटातली तुझी हिरॉईन दुसऱ्या चित्रपटात तुझी मुलगी असेल आणि तिसऱ्यात आई. तिची भूमिका बदलणार नाही. पण तू मात्र यातून वेगळा ठरशील.’’
‘‘हां दादा, जो आप ठीक समझे।’’
हा संवाद मला ए. के. हंगल यांनी ऐकवला होता. यातलं एक पात्र होतं ते- खुद्द ए. के. हंगल. आणि दुसरा होता हरीभाई जेठालाल जरीवाला. कोण हा जरीवाला, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. कारण हे नाव एखाद्या व्यापारउदीम करणाऱ्या माणसाचं वाटतं. हाही व्यापारउदीम करणारा माणूसच होता; पण तो वस्तूंचा किंवा पैशांचा व्यापार करणारा नव्हता, तर तो होता रंगमंचावर भावनांचा व्यापार मांडणारा. एकाच वेळी लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणणारा. एकाच वेळी खळखळवून हसवणारा, तसंच दुसऱ्या क्षणी आपल्या मुठी वळवून मनातला क्रोध व्यक्त करायला लावणारा अभिनयाचा मेरुमणी संजीवकुमार! माझा जिगरी दोस्त. एक हरफनमौला कलाकार. ग्रेट अभिनेता, जिवाला जीव देणारा मित्र आणि संवेदनशील, सच्चा इन्सान! तुम्ही त्याच्याकडे साधा हातरुमाल मागा, तो अंगातला शर्ट काढून देईल. पण तुम्ही त्याला कुणाचं काही वाईट करण्यासाठी सांगा.. तुम्हाला फटका खावा लागेल. त्यानं उभ्या आयुष्यात कुणाचं वाईट केलं नाही. कुणाशी दुश्मनी केली नाही. घेतला, तो फक्त स्वत:ला त्रास करून घेतला.
हरीभाईची आणि माझी पहिली भेट झाली ती आमचे फॅमिली फ्रेंड बी. आर. चोप्रासाहेबांकडे! आमचा ‘पाकिजा’ रिलीज झाला होता. लोक आम्हाला थोडंसं ओळखू लागले होते. संजीवकुमारचंही नाव झालेलं होतं. तो एक नावाजलेला अभिनेता होता. बी. आर. चोप्राजींनी माझा आणि त्याचा परिचय करून दिला. आणि त्याच्याशी लगेचच मत्री झाली. याचं कारण त्याचा बोलका स्वभाव व दुसऱ्याला योग्य ते महत्त्व देऊन त्याच्याशी परिचय करून घेण्याची त्याची वृत्ती. तो बी. आर. चोप्राजींना म्हणाला होता- ‘‘मी सूरतहून आलोय. मला अॅक्टिंगच्या क्षेत्रात नाव मिळवायचंय.’’ अभिनयाच्या वेडानं त्याला झपाटलेलं होतं. मुंबईत आल्यावर तो ‘इप्टा’त गेला. ‘इप्टा’ ही रंगभूमीवरील एक महत्त्वाची चळवळ. भारतातली ही रंगकर्मीची सर्वात जुनी चळवळ! १९४३ मध्ये काही कलाकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या संस्थेनं कित्येक जबरदस्त अभिनेते, अभिनेत्री रंगभूमीला दिले. पृथ्वीराज कपूर, बलराज सहानी, ऋत्विक घटक, सलील चौधरी हे तिचे बिनीचे शिलेदार. अशा संस्थेत हरीभाईने आपलं करीअर सुरू केलं. आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांना भारून टाकलं. ए. के. हंगल गप्पा मारताना मला म्हणाले, ‘‘तो सुरुवातीपासून नसíगक अभिनयाच्या स्कूलचा विद्यार्थी होता. त्याला कधीही अवास्तव अभिनय करायला आवडलं नाही. व्यक्तिरेखेचे बारकावे तो खूप छान द्यायचा. अमुक एका पात्राची रचना कशी आहे? त्या पात्राचा स्वभाव कसा आहे? ते नाटकात कसं विकसित झालं आहे?.. या साऱ्याचा तो खोलवर विचार करत असे. मला तर त्यानं अक्षरश: भंडावून सोडलं होतं. तो केंद्रवर्ती भूमिका करण्यासाठीच जन्माला आला होता अशी त्याची ठाम समजूत होती. ती मोडून काढायला मला काहीसा त्रास झाला. जेव्हा मी आमच्या इप्टाच्या ‘डमरू’ नाटकात त्याला सहा मुलांच्या बापाची भूमिका करायला सांगितली, तेव्हा त्यानं माझ्याकडे कुरकुर केली. मी त्याला म्हणालो की, ‘‘हरीभाई, तुला ही भूमिका उत्तमातली उत्तम वठवता येईल याची मला खात्री आहे. तुझा रोल कसाही असो, तो सर्वोत्कृष्ट पद्धतीनं कसा करता येईल ते बघ.‘‘ हरीभाईने माझं ऐकलं.
हरीभाईची आणि माझी दोस्ती चोप्राजींच्या घरी सुरू झाली, ती त्याच्या अंतापर्यंत कायम राहिली. आमच्या दोघांची बायपास सर्जरीही एकाच वेळी झाली. त्याविषयी मी नंतर सांगतो. चोप्राजींमुळे हरीभाई नेहमी आमच्याकडे येत असे. तो हसतमुख होता. त्याला खाण्यापिण्याचा मोठा शौक होता. तोच त्याला नंतर घातक ठरला. बी. आर. चोप्राजींचं व आमचं अगदी कौटुंबिक नातं होतं. सतत कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आम्ही एकत्र येत असू. हरीभाईची व माझी भेट होण्याआधीच हरीभाई हा ‘संजीवकुमार’ या नावानं प्रसिद्ध झाला होता. त्याच्या नावाचा मोठा दबदबा तयार झाला होता. चोप्राजींकडे पहिल्यांदा भेटल्यावर एका मोठय़ा स्टारला आपण भेटतोय असं मला वाटलंच नाही. त्यानं ‘हॅलो’ म्हटलं, मी ‘हॅलो’ म्हटलं आणि आमच्या दोस्तीनं परस्परांना ‘हॅलो’ म्हटलं. त्या दिवसापासून आमच्या दोस्तीचा सिलसिला सुरू झाला. मी त्याला हरीभाई किंवा संजीव अशा दोन्ही नावानं हाक मारायचो. पण त्यानं कधीही ‘कुलवंतजी’शिवाय मला हाक मारली नाही. मी त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होतो, हे तो कायम ध्यानात ठेवायचा.
आमची भेट बी. आर. चोप्राजींकडेच बऱ्याचदा होत असे. त्यांच्या घरी कोणीही कोणत्याही प्रकारचं व्यसन करत नाही. मीही मद्यपान करत नाही. पण संध्याकाळी गप्पा रंगत गेल्या, साडेसात-आठ वाजून गेले की संजीवकुमार रवी चोप्राला सांगायचा, ‘‘अरे, रवी, कोहली अंकल आये है, उनको ड्रिंक वगरे कुछ पुछेगा की नहीं?’’ चोप्राजींच्या गालावर स्मितहास्य उमटायचं. ते रवीला सांगायचे, ‘‘रवी, जा भई, ब्लॅक लेबल लेके आ। त्याची ड्रिंक्सची वेळ झालीय.’’ मी संजीवला विचारायचो, ‘‘तू मद्यपान का सोडत नाहीस?’’ तो हसून म्हणायचा, ‘‘मी लाख सोडीन, पण मद्यानं मला सोडलं पाहिजे ना?’’ आणि हसायचा. त्याचं एक होतं- तो जसजसं मद्यपान करत जायचा, तसतसा गप्प गप्प होत जायचा.. शांत होत जायचा.
संजीवकुमारला कार्सचा शौक होता. तो सतत नवनव्या गाडय़ा घ्यायचा. त्याच्यासारखी गाडी दुसऱ्या कुणाची नसावी याची तो काळजी घ्यायचा. मलाही कार्सची आवड आहे. मी नेहमी मोठय़ा आकाराची कार घ्यायचो. पण एकदा संजीवकुमारने सरकारी टेंडर भरून छोटीशी स्पोर्ट्स डॅटसन कार घेतली. मला ती कार खूप आवडली. सहा महिन्यांनी पुढच्या टेंडरमध्ये मीही तशीच कार घेतली. आमच्या प्रीतमच्या बाहेर स्पोर्ट्स कार बघून संजीवकुमार महाराज मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, आपने मेरे जैसीही कार ली. आप मुझे कॉपी करते हो? हे काय बरोबर नाही. मला सांगायचं तरी.. मी तुम्हाला माझीच कार दिली असती.’’
‘‘अरे, ही मी टेंडरमध्ये घेतली.’’
‘‘ठीक है भई। आता असं करा, माझी डॅटसन तुम्हीच घ्या. मी चाळीस हजारांना घेतली होती ती. तुम्हाला म्हणून मी वीस हजारांना देतो. सहा महिने चाललीय फक्त!’’ मी फक्त हसलो व विषय सोडून दिला.
बी. आर.जींच्या ‘पती, पत्नी और वह’च्या सेटवर मी गेलो होतो. संजीव त्यात नायक होता. मेकअपरूममध्ये मी त्याला विचारलं, ‘‘तुला हरीभाईचा संजीवकुमार कोणी केलं?’’
‘‘कुलवंतजी, मी पहिला चित्रपट केला होता ‘हम हिंदुस्तानी’- १९६० साली! सुनील दत्तसाहेब, आशा पारेखजी त्यात होते. मी त्यात एका इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. क्या बताऊं आप को? त्यातल्या कुत्र्याचंही नाव टायटलमध्ये आलं, पण माझं नाव आलं नाही. पुढची चार-पाच र्वष संघर्षांची गेली. इप्टातलं नाटक सुरूच होतं. त्यादरम्यान माझी आणि सावनकुमार टाकची भेट झाली. आमची दोस्ती रंगत गेली. त्यानं मला सुचवलं की, हरीभाई जरीवाला हे नाव रंगमंचासाठी ठीक आहे, पण सिनेमासाठी आपण तुझं नाव बदलू या. त्यानं त्याच्या ‘नौनिहाल’ या नव्या चित्रपटाची आखणी करायला घेतली होती, त्यात तो मला नायकाची भूमिका देणार होता. त्यानं माझं नाव ‘संजीवकुमार’ ठेवलं. ‘नौनिहाल’ नंतर आला, पण ‘इन्ट्रोडय़ुसिंग संजीवकुमार’ असं रूपेरी पडद्यावर दिसलं ते ‘निशान’ नावाच्या चित्रपटात! बस्स.. तेव्हापासून मी संजीवकुमार झालो.’’
‘पती, पत्नी और वह’ हा चित्रपट मस्त बनला होता. विनोदाचं टायिमग सेन्स संजीवकडे जबरदस्त होतं, हे त्यात दिसलं. पण त्या चित्रपटाच्या यशाच्या आनंदाचं एक घरगुती सेलिब्रेशन झालं होतं. नेमकीच मंडळी होती. आमच्या घरी सारे जमले होते. बी. आर. चोप्रांचं सगळं कुटुंब, संजीव, विद्या सिन्हा असे सगळे जमले होते. सर्व जण मजेत जेवत होते. तेवढय़ात संजीव म्हणाला, ‘‘चोप्राजी, पिक्चर तो अच्छी बनी, लेकीन आपने रोल का गलत अलॉटमेंट किया।’’ चोप्राजी चमकले. ‘‘क्या हुआ हरीभाई? सब तो ठीक है।’’ ‘‘चोप्रासाब, भाभीजी, असं बघा- पिक्चरमध्ये माझी बायको कोण आहे, तर विद्या सिन्हा! खऱ्या आयुष्यात तिचं लग्न झालंय. ती दुसऱ्या कोणाची तरी बायको आहे. किमान मला एक बायको तर मिळवून द्यायची!’’ मग सगळ्यांना त्याच्या बोलण्याचा उलगडा झाला. मिसेस चोप्रा त्याला म्हणाल्या, ‘‘हरीभाई, तुम्ही खूप मजेदार आहात. उगाच मुलींची चेष्टा करता. पण ज्यांना तुमच्याशी लग्न करायचंय त्यांच्याकडे बघतही नाही.’’
‘‘भाभीजी, ते काही मला सांगू नका. एक तर माझी हिरॉईन बदला किंवा माझं लग्न लावून द्या.’’ मिसेस चोप्रांना हसू आवरेना. ‘‘हरीभाई, दोनो चीजे मुश्कील है।’’
मी हरीभाईच्या घरी जायचो. त्याच्या घरात खाली पसरलेली मोठी गादी असायची. त्यावर हे स्वामी पहुडू स्वीकारत असत. गादीशेजारी एक कपाट होतं. त्या कपाटाच्या जमिनीलगतच्या खणात दोन-अडीचशे परफ्यूम्सच्या बाटल्या होत्या. मला आश्चर्य वाटलं. ‘‘हरीभाई, तू इतक्या परफ्यूम्सचं काय करतोस?’’
‘‘कुलवंतजी, माझ्याकडे जे पाहुणे येतात त्यांच्या आवडीचं परफ्यूम मी त्यांना लावतो. तुम्हाला कोणतं आवडतं, ते सांगा.’’ त्यानं माझ्या आवडीचं परफ्यूम माझ्या अंगावर फवारलं.
खरं म्हणजे संजीवला हेमामालिनीजी खूप आवडायच्या. त्याला त्यांच्याशी लग्न करायचं होतं, ही बाब सर्वज्ञात आहे. पण हेमाजींच्या मनानं कौल दिला धर्मेद्रला. संजीववर जीव लावून बसली होती सुलक्षणा पंडित. सुलक्षणा ही खरोखरच सुलक्षणा होती. ती अतिशय गुणी होती. सुंदर होती. अप्रतिम गायची. ती नऊ वर्षांची असल्यापासून बसाखीत गायची. तिच्या पहिल्याच बसाखीत ती स्टेजवर जाणार, तोच दुर्दैवी बातमी आली, की तिचे वडील- ख्यातनाम शास्त्रोक्त गायक प्रताप नारायण पंडित यांचं निधन झालंय. आम्ही त्या चिमुरडय़ा मुलीला म्हणालो, ‘‘तू गाऊ नकोस, आधी घरी जा.’’ पण गायनावर विलक्षण निष्ठा असलेली सुलक्षणा म्हणाली, ‘‘मी आधी गाणं गाते, मग जाते. पिताजींनाही ते आवडलं नसतं.’’ तिची ही समíपत वृत्ती मला आवडली. आम्ही तिच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलला. तिनं आपलं कुटुंब उभं केलं. एक गायिका अभिनेत्री म्हणून सुलक्षणाची कारकीर्द बहरत होती आणि तिचा जीव संजीवमध्ये अडकला होता. जेव्हा पहिल्यांदा संजीवला हृदयविकाराचा त्रास झाला तेव्हा तो रुग्णालयात गुपचूप पंधरा दिवस राहून आला. त्यानंतर त्यानं सुलक्षणाला माझ्या समोर निरोप पाठवला की, ‘आमच्या घरात पन्नाशीपलीकडे कोणी जगत नाही. मलाही तशी सूचना मृत्यूनं दिली आहे. माझ्याशी लग्न केलं तर पस्तावशील.’ पण ती थांबून राहिली. पुढे संजीवकुमार हृदयविकारानं गेला. पण सुलक्षणा आजही त्याची वाट पाहत थांबली आहे. अयशस्वी प्रेमासाठी झुरणं हे फक्त चित्रपटांतच असतं असं नाही, ते वास्तवातही असतं, हे तिनं दाखवून दिलं आहे.
संजीवकुमारचा आणि माझ्या पापाजींचा वाढदिवस एकाच दिवशी असतो- ९ जुल रोजी. एका ९ जुलला रात्री अकराच्या सुमारास संजीवकुमार प्रीतमच्या दरवाजात आला. आम्ही प्रीतमच्या वर तिसऱ्या मजल्यावर राहतो. त्याच्याबरोबर त्याचे मित्र होते, संगीत करणारे काही कलाकार होते. जोरजोरात ढोलक वाजवत सारे प्रीतमसमोर आले. पापाजींवर त्याचं खूप प्रेम. त्यांचंही संजीववर खूप प्रेम. ‘‘पापाजी नीचे आओ, हमें आशीर्वाद दो..’’ असं ओरडत हे महाशय धरणं धरून बसले. पापाजी झोपले होते. संजीव म्हणाला, ‘‘असं कसं झोपले? आज आमचा वाढदिवस आहे. त्यांना खाली बोलवा, नाहीतर आम्ही वर जातो.’’ पापाजी खाली आले. संजीवने त्यांचा आशीर्वाद घेतला. ते त्या सगळ्या टोळीला घेऊन वर आले. वर नवी मफल सजली. त्या मफिलीला मद्यपानाची जोड होती. मजा करता करता आपली खुन्नस काढण्याच्या मिषानं संजीवच्या एका लेखक मित्रानं दुसऱ्या एका ख्यातनाम लेखक मित्राच्या कानफटात लगावली. सगळी मफल क्षणात थांबली. संजीवचं त्या प्रकाराकडे लक्ष नव्हतं. पण नेमकं काय झालं, हे त्याला कळलं. त्यानं पटकन् त्या ख्यातनाम लेखकाजवळ जाऊन दिलगिरी व्यक्त केली व ज्या लेखकानं ते गरकृत्य केलं होतं, त्याला ताबडतोब तिथून बाहेर काढलं. तो परत कधी संजीवबरोबर दिसला नाही.
संजीवकुमार हा मत्रीला जागणारा माणूस होता. आम्ही खालीद अख़्तर नावाच्या एका दिग्दर्शकाच्या अडकलेल्या चित्रपटाला फायनान्स करून तो प्रोडय़ुस करावा अशी सूचना प्राणसाहेबांनी केली. सूचना कसली? आज्ञाच ती! आम्ही ती मान्य केली. ‘लेडीज टेलर’ हा तो सिनेमा. संजीव त्यात हिरो होता. अमजद खान, रीना रॉय, प्राणसाहेब अशी तगडी स्टारकास्ट होती. खालीद हा के. असीफ यांचा ‘मुघल-ए- आझम’च्या वेळी साहाय्यक होता. सच्चा होता. संजीवला जेव्हा कळलं, की खालीदला मदत करायला आम्ही तो चित्रपट हाती घेतलाय; त्यानं कलाकारांची एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये प्राणसाहेबांनी व त्यानं रीना रॉय, अमजद आदींना सांगितलं, ‘‘आपण चित्रपट पूर्ण झाल्यावर पसे घेऊ या.’’ त्यानं तर सांगितलं की- ‘‘चित्रपट चालला तर मला पसे द्या, नाही तर नको.’’
संजीव आणि मी- आम्हा उभयतांना हृदयविकाराचा त्रास एकाच वेळी झाला. त्याला दुसऱ्यांदा व मला पहिल्यांदा! आम्ही एकमेकांशी त्यासंदर्भात बोलत असू. अनुभव शेअर करत असू. भारतात त्या काळात बायपास शस्त्रक्रिया फारशा होत नसत. आम्ही अमेरिकेत बायपास शस्त्रक्रिया करायचं ठरवलं. त्यानं क्लीव्हलँडला व मी लॉसएंजल्सला. मी त्याला सांगत होतो की, ‘माझ्याबरोबरच चल, माझ्याबरोबर राहा.’ माझा एक नातेवाईक- पुतण्या तिथं राहत होता. आमचं कुटुंबच होतं तिथे. संजीवबरोबर कुणी नव्हतं. पण त्यानं ऐकलं नाही. तो क्लीव्हलँडला गेला, बायपास केली. त्याच्या आधी चार दिवस माझीही बायपास झाली होती. आम्हाला सहा आठवडय़ांची विश्रांती घ्यायला सांगितली होती. संजीव ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मला हॉस्पिटलमधून आठ दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. त्याला अजून तीन-चार आठवडे तिथं राहावं लागणार होतं. पण मला लवकर डिस्चार्ज कसा मिळाला, याबद्दल तो सर्वाना विचारू लागला. मी म्हणालो, ‘‘अरे, मी माझ्या नातेवाईकाच्या घरी राहणार आहे. तुला ये सांगितलं तर तू ऐकत नाहीस.’’ शेवटी कसाबसा महिनाभरानं तो भारतात निघून आला. मी त्याला सारखा सांगत होतो, ‘‘हरीभाई, तू सहा महिने काही करू नकोस. आराम कर. मग आरामात शंभरी गाठ.’’ तो भारतात परतला आणि त्यानं लगेचच कामही सुरू केलं. त्याचं आधीच रोगजर्जर झालेलं शरीर कामाचा ताण सहन करू शकलं नाही. मी भारतात परतायच्या आधीच तो ६ नोव्हेंबर १९८५ रोजी हे जग सोडून निघून गेला.
भारतात परतल्यावर मी त्याच्या घरी उगाचच चक्कर मारली. तो अर्थातच घरात नव्हता. त्याची परफ्यूम्सही जागेवर नव्हती. तो आणि त्याची परफ्यूम्स तिथं कशी असणार? देवाच्या आवडीचं परफ्यूम कोणतं आहे, हे समजून घ्यायला ती सारी परफ्यूम्स तो सोबत घेऊन गेला असणार!
ksk@pritamhotels.com
शब्दांकन : नीतिन आरेकर