ही माझी कुठलीही कविता कुणाही विवक्षित व्यक्तीला उद्देशून नाही, हे पटवून देताना माझी मात्र दमछाक व्हायची. कुणाही कवी, कलावंतांचं दैनंदिन लौकिक आयुष्य आणि त्यांचं संपूर्ण व्यक्तिगत स्वरूपाचं मानसिक पातळीवरचं जगणं या दोन स्वतंत्र गोष्टी असू शकतात, नव्हे, असतातच.. त्या दोन्ही पातळय़ा अनेक अर्थानी परस्परांशी जोडलेल्या असतात आणि तरीही स्वतंत्रही असतात. जगण्यातील अनुभवातूनच कविता आपला जीवनरस घेतात, हे खरंच, पण कलाकृती बनताना त्या अनुभूती काही वेगळय़ाच होतात, जणू एक नवा जन्मच घेतात.. कधी कधी असंही वाटतं, कुणाही पुरुष कवी- कलावंत व्यक्तींच्या मनोविश्वात एक अमूर्त स्त्रीरूप अखंड तरळत असतं आणि तेच त्याच्या सर्व आविष्काराची मूलभूत प्रेरणाही होत राहतं. त्याच्या वैयक्तिक जीवनात जे अविस्मरणीय आणि अनमोल असे अनुबंध येतात हे त्या प्रतिमेचेच अंश असतात. पण तरीही ती मूळ धूसर रूपप्रतिमा जराही उणावत नाही.. आणि हे सगळं स्वत: कवीच्याही नकळत घडत असतं, हे कलात्मक वास्तव समजून घेतलं तर ‘कवितासखी’च्या या ‘तू’ कवितांचा प्रवास समजून घेणं सोपं होईल..
‘दिसलीस तू. फुलले ॠतू’ हा या जाणिवेचा पहिला प्रकट आविष्कार होता. ‘सखि, मंद झाल्या तारका. आता तरी येशील का’ हे आर्त आवाहनही त्या अनामिक ‘तू’ साठीच होतं.. ‘मन लोभले मनमोहने’ ही कबुलीही त्या ‘तू’लाच दिली होती.. ‘पक्ष्यांचे ठसे’मधील ‘एक सांगशील आपले रस्ते अवचित कुठे, कसे जुळले.’ ‘तुझ्या-माझ्या सहवासाचा योग..’ आणि ‘काय म्हणालीस, वेळ झाली आता तुला निघायला हवं..’ या तीन संपूर्ण वेगळय़ा भावावस्था मांडणाऱ्या तीन कविता हे त्या ‘तू’ चे घेतलेले तीन अटळ निरोप होते.. ‘लय’ या कवितासंग्रहातील कविता या दृष्टीनं मला अधिक परिपक्व आणि त्यामुळेच जवळच्या वाटतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा