‘आप’ने महाराष्ट्रात भ्रष्टाचाराबरोबरच सर्वच पक्षांतील घराणेशाहीविरुद्ध प्रचार करण्याचे ठरविले आहे. लोकशाही संकल्पनेच्या विरोधात जाणाऱ्या घराणेशाहीचा पराभव करणे हा पक्षाचा प्रमुख मुद्दा राहणार आहे, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.
घराणेशाहीची संस्थाने झालेल्या मतदारसंघात ‘आप’ने ताकदीने लढण्याचे ठरविले आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दलित चळवळीतील एक अभ्यासू कार्यकर्ता म्हणून ओळख असललेले ललित बाबर यांना ‘आप’ने मैदानात उतरवले आहे. बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात अभिनेते नंदू माधव लढणार आहेत. मुंबईत देवरांच्या विरोधात मीरा संन्याल लढतील. ठाण्यातील गणेश नाईक यांच्या घराणेशाहीविरुद्ध संजीव साने लढणार आहेत. सिंचन गैरव्यवहार चव्हाटय़ावर आणणारे विजय पांढरे यांची नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या घराणेशाहीविरुद्ध लढाई होणार आहे.
इतर कुठल्याही पक्षाशी युती न करता ‘आप’ने महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविण्याचे ठरविले आहे. त्यापैकी १६ मतदारसंघांतील उमेदवारही जाहीर करण्यात आले आहेत.
सर्वपक्षीय घराणेशाहीविरुद्ध ‘आप’चा एल्गार
‘आप’ने महाराष्ट्रात भ्रष्टाचाराबरोबरच सर्वच पक्षांतील घराणेशाहीविरुद्ध प्रचार करण्याचे ठरविले आहे. लोकशाही संकल्पनेच्या विरोधात जाणाऱ्या घराणेशाहीचा पराभव करणे हा पक्षाचा प्रमुख मुद्दा राहणार आहे
First published on: 03-03-2014 at 04:51 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap against all party gharana shahi