आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी ३० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील १० जणांचा समावेश आहे. पूर्व दिल्लीतून महात्मा गांधी यांचे नातू राजमोहन गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे संदीप दीक्षित येथील खासदार आहेत.
हिमाचल प्रदेशातील कांगडा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार राजन सुशांत यांना उमेदवारी मिळाली आहे. श्रीनगरमधून रझा मुझफ्फर भट्ट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. फारुख अब्दुल्ला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर मध्य प्रदेशातील विदिशामधून सुषमा स्वराज यांच्या विरोधात भागवत सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने यापूर्वी २० जणांची पहिली यादी जाहीर केली आहे.
आपचे राज्यातील उमेदवार
ठाणे-संजीव साने,औरंगाबाद-सुभाष लोमटे, सोलापूर-ललित बाबर,चंद्रपूर- वामनराव चटप, मावळ-मारुती भापकर, अमरावती-भावना वासनिक, सांगली-समीना खान, भंडारा-गोंदिया-प्रशांत मिश्रा, जालना-दिलीप म्हस्के, बीड-नंदू माधव.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा