येथील समूह गृहनिर्माण संस्थांमध्ये विकासकामे हाती घेण्यासाठी आमदारांना आपल्या निधीचा वापर करता येत नाही, या सापत्नभावाच्या कायद्यात बदल करावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडे केली आहे. आपली मागणी मान्य न झाल्यास शहरात आंदोलनाचा इशाराही आपने दिला आहे. समूह गृहनिर्माण संस्थांच्या सदनिकेत राहणाऱ्या रहिवाशांच्या कल्याणासाठी अथवा विकास कामांसाठी आमदारांचा निधी वापरता येणार नाही असा कायदा आहे आणि तो भेदभाव करणारा आहे, असे आपचे आमदार राजेश गर्ग यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap urges najeeb jung to change mla fund spending law