अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीला आगामी लोकसभा निवडणुकीत १० जागा मिळाल्या तरी ते आश्चर्यकारक ठरेल, असे भाजपच्या दिल्ली विभागाचे प्रमुख हर्षवर्धन यांनी रविवारी येथे सांगितले.
अलीकडेच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा गैरवापर करून लोकांची दिशाभूल व फसवणूक केली आणि त्याच मार्गाने त्यांनी २८ जागा मिळविल्या. मात्र आता त्यांचे खरे स्वरूप उघडकीस आले असून त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पाच ते दहा जागा मिळाल्या तरी आपल्याला आश्चर्यच वाटेल, असे हर्षवर्धन म्हणाले. देशात अस्थैर्य आणि अराजक माजविण्याच्या हेतूने आम आदमी पार्टीला अमेरिकेच्या सीआयएकडून फोर्ड फाऊंडेशनमार्फत निधी मिळत असल्याचाही गंभीर आरोप हर्षवर्धन यांनी केला.

Story img Loader