भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आलेल्या मतदारसंघावरून वादळ उठलेले असतानाच अडवाणींना आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचे खंदे समर्थक म्हणून गणले जाणारे आणि अहमदाबाद (पूर्व) मतदारसंघातील विद्यमान भाजप खासदार हरीन पाठक यांना डावलून बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
‘आयारामां’ना उमेदवारी देण्यावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी चंडिगढसह अनेक ठिकाणी उघड झाली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देण्यात आलेल्या मतदारसंघावरून तसेच जसवंत सिंग यांना उमेदवारी न देण्यावरून ‘वादळ’ उठले होते. ते शांतहोण्या अगोदरच, भाजपने अहमदाबाद (पूर्व) मतदारसंघातून बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांना उमेदवारी जाहीर केली.
या मतदारसंघाचे मावळते खासदार हरीन पाठक हे अडवाणीसमर्थक मानले जातात. त्यांनाच तिकीट नाकारल्याने अडवाणींच्या गोटात पुन्हा एकदा नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा