२०१६ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे बंगालचा दौरा करणार आहेत. येत्या दोन महिन्यात संघटनात्मक बदल, राज्यातील महत्त्वाचे मुद्दे, लोकांच्या अपेक्षा समजून घेम्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. पुढील महिन्यात ६ आणि ७ तारखेला होणाऱ्या राज्य भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीस अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी शहा काही सार्वजनिक सभांना संबोधितही करणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांनी दिली.तर येत्या २४ ऑगस्टला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बंगालमध्ये येणार आहेत.
अमित शहा, अरूण जेटली बंगालच्या दौऱ्यावर
२०१६ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे बंगालचा दौरा करणार आहेत.
First published on: 07-08-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah arun jaitley to visit west bengal to strengthen