भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीत प्रचारसभा घेण्यास तेथील निवडणूक अधिकाऱयाने परवानगी नाकारल्याचा निषेध व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे भाजप नेते अरुण जेटली यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.
वाराणसीत नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेला परवानगी नाकारली
अरुण जेटली म्हणाले, “देशाच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला आपल्या मतदार संघात प्रचारसभा घेता येत नाही. अशी घटना याआधी कधीच झाली नसेल. यातूनच मोदींना रोखण्यासाठी विरोधकांची प्रयत्नशीलता आणि कारस्थान लक्षात येते. आम्हाला अजूनही प्रचारसभेसाठी कोणतीही जागा देण्यात आली नाही. परवानगी देण्यासाठी वाराणसीतील निवडणूक अधिकाऱयांकडून विलंब केला जात आहे. परवानगी नाकारण्यात आल्याची कोणत्याही प्रकारचे अधिकृत माहितीपत्रक आम्हाला मिळाले नाही केवळ दुरध्वनीवरून परवानगी नाकारण्यात आल्याचे आम्हाला सांगण्यात आले.” असेही जेटली म्हणाले.
तसेच “देशाच्या लोकशाहीत चक्क पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला आपल्या मतदार संघात प्रचारसभा घेता येत नाही हे खेदजनक आहे. त्यामुळे या निषेधार्थ आम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत.” असेही जेटली यांनी सांगितले.

Story img Loader