‘पेडन्यूज’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगात उद्या सुनावणी होणार असतानाच लोकसभेवर निवडून आल्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा गुरुवारी सादर केला.
निवडणूक आयोगात उद्या सुनावणी असतानाच चव्हाण यांनी घाईघाईत आमदारकीचा राजीनामा दिल्याने वेगळी चर्चा सुरू झाली. कारण त्यांच्या आमदारकीच्या निवडीलाच आव्हान देण्यात आले आहे. दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व कायम ठेवता येत नाही. नियमानुसार काही मुदतीत एका सदनाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. सात आमदार लोकसभेवर
राज्यविधानसभेतील अशोक चव्हाण यांच्यासह राजीव सातव, नाना पटोले, गोपाळ शेट्टी, अ‍ॅड. चिंतामण वगना, संजय जाधव आणि राजन विचारे या आमदारांची लोकसभेवर निवड झाली आहे.