माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्याकडे राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेतील काँग्रेसच्या नेतेपदी त्यांची निवड जाहीर झाली आहे. माजी केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांची सभागृहातील काँग्रेसचे उपनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.
राज्यसभेतील विद्यमान संख्याबळ लक्षात घेता काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार हे उघड असल्यामुळे गुलाम नबी आझाद हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होतील, असे दिसते. राज्यसभेची विद्यमान सदस्यसंख्या २४५ असून त्यापैकी काँग्रेसचे संख्याबळ ६७ आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के इतकी खासदार संख्या पक्षाकडे असणे गरजेचे असते. त्या नियमानुसार, काँग्रेसला हे पक्षनेतेपद मिळू शकते.
दरम्यान, लोकसभेत काँग्रेसचे नेतेपद मल्लिकार्जुन खारगे यांच्याकडे, तर उपनेतेपद अरुण जेटली यांचा पराभव करणाऱ्या कॅ. अमरिंदर सिंग यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. राज्यसभेतील काँग्रेसच्या प्रतोदपदी कोण याबाबत मात्र अद्याप घोषणा झालेली नाही.
दरम्यान १६ व्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी रविवारी राष्ट्रपतींची भेट घेतली.
आज अभिभाषण
नवी दिल्ली : संसदेच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सोमवारी संबोधित करणार आहेत़ त्यांनंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरुवात करेल़ सकाळी अकरा वाजता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल़ यात राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासनापुढील प्राथमिकता संसदेपुढे मांडतील़ वाढती महागाई, चलन फुगवटा यांवर मात करत अर्थव्यवस्थेला चालना देण्याबाबत ते मार्गदर्शन करतील, अशी शक्यता आह़े
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2014 रोजी प्रकाशित
गुलाम नबी आझाद राज्यसभेचे विरोधी पक्षनेते
माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्याकडे राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेतील काँग्रेसच्या नेतेपदी त्यांची निवड जाहीर झाली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 09-06-2014 at 12:26 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Azad made leader of congress in rs set to become leader of opposition