राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत सुरक्षित आणि विजयाची खात्री देणारा राज्यातील एकमेव मतदारसंघ लोकसभेसाठी कोणता असेल तर तो ‘बारामती लोकसभा मतदारसंघ’ होय.
१९६७ पासून शरद पवार आणि आता सुप्रिया सुळे यांचा हा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ‘बालेकिल्ला’ म्हणून ओळखला जातो. स्वत: शरद पवार किंवा त्यांनी पाठिंबा दिलेला उमेदवार या मतदारसंघामधून विजयी झाला असून, हा इतिहास बदलण्यासाठी महायुतीच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे आपले नशीब आजमावत आहेत.
जानकर हे महायुतीचे उमेदवार असून, धनगर समाजाचे नेतृत्व करीत आहेत. या मतदारसंघात धनगर समाजाची सुमारे साडेतीन लाख मते असल्यामुळे यंदा मी विजयी होईन, असा विश्वास जानकर व्यक्त करीत आहेत.
आम आदमीच्या वतीने निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे राहत आहेत. ते मूळचे मोरगाव (ता. बारामती) येथील आहेत. तसा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खोपडे यांचा संपर्क अत्यल्प आहे. तरी आम आदमी पार्टीमधून ते आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने काळूराम चौधरी यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळाली आहे. मतदारसंघामध्ये बारामती शहर आणि नगरपालिका वॉर्डमध्ये काळूराम चौधरी यांचा असलेला संपर्कवगळता त्यांची ओळख कमीच आहे. या मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे विकासाचा मुद्दा असला, तरी बारामती शहर परिसरामधील चारचाकी वाहनांच्या दुहेरी टोलवसुलीचा प्रश्न, बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, दुष्काळी परिस्थिती, गारपिटीद्वारे आलेले नैसर्गिक संकट, असे अनेक प्रश्न आहेत. यंदा सुप्रिया सुळे या मागील निवडणुकीपेक्षा किती मताधिक्क्य अधिक घेतील, याकडेच सर्वाचे लक्ष आहे. नेहमीप्रमाणे प्रचाराची शेवटची सभा शरद पवार स्वत: बारामतीत घेणार आहेत.

“मागील ५ वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसची खासदार म्हणून आदरणीय पवार साहेब, माननीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकत्रे यांच्या सहकार्याने मी विकासकामे राबविली आहेत. इथून पुढेही त्यांच्या साथीने बारामती लोकसभा मतदारसंघात लोकोपयोगी कामे राबविण्याचा माझा निर्धार आहे. मला खात्री आहे मतदार सुज्ञ आहेत, ते निश्चितच आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देतील.”   
सुप्रिया सुळे

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra assembly election 2024 akot vidhan sabha constituency Prakash Bharsakale
अकोटमध्ये जातीय राजकारण कुणाच्या पथ्यावर?
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
मराठा समाज ८० टक्के हिंदुत्ववादी; महायुतीलाच पाठिंबा मिळेल!उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाम विश्वास
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
ubt mla vaibhav naik face nilesh rane kudal in assembly constituency
लक्षवेधी लढत : कुडाळमध्ये राणेंच्या वर्चस्वाचा कस
right to vote opportunity to create the future
मताधिकार ही भविष्य घडविण्याची संधी!
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त