निराधार आणि बदनामीकारक आरोप केल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्याविरूध्द कायदेशीर नोटीस बजावली आहे. आपल्याविरुध्दचे आरोप मागे न घेतल्यास १०० कोटी रुपये भरपाईचा दिवाणी दावा दाखल करण्याचा इशारा भुजबळ यांनी दिला आहे.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन, मुंबईतील काही शासकीय भूखंडांच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे प्रकल्प आदींबाबत सोमय्या यांनी भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांविरोधात नुकतेच काही आरोप केले होते. शासनाच्या पायाभूत समितीने या प्रकल्पांचा सखोल अभ्यास करून मान्यता दिली होती. दोन दिवसांत माफी न मागितल्यास दावा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नोटिसांना घाबरत नाही-सोमय्या
आपण अशा नोटिसांना घाबरत नाही. उलट आमचा भ्रष्टाचारविरोधातील लढा आणखी तीव्र होईल, असे सोमय्या यांनी सांगितले. भुजबळच निवडणुकीला भलतेच घाबरलेले दिसतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
भुजबळांची सोमय्यांना नोटीस
निराधार आणि बदनामीकारक आरोप केल्याने सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्याविरूध्द कायदेशीर नोटीस बजावली आहे.
First published on: 14-03-2014 at 12:06 IST
TOPICSछगन भुजबळChhagan BhujbalलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 1 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhujbal sent defamation notice to kirit somaiya