सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले आहे. त्यांचे पुतणे खासदार समीर भुजबळ यांना डावलून छगन भुजबळांनाच लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरविण्याचे पक्षनेतृत्वाने ठरविले आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस लढवीत असलेल्या २२ मतदारसंघांतील राजकीय परिस्थितीचा आढावाही रविवारी घेण्यात आला. राज्यातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आता लोकसभा निवडणूक लढवावी, असा पवार यांचा आग्रह आहे. भुजबळांसह अनेक मंत्री लोकसभेसाठी अनुत्सुक असून त्यांनी पवार यांच्याकडे आपल्याला महाराष्ट्रातील राजकारणातच राहू देण्याची विनंती केली होती. भुजबळ यांच्या घरात एकालाच उमेदवारी देण्याचे पक्षनेतृत्वाकडून सूचित करण्यात आले होते.
छगन भुजबळ नाशिकमधून लढणार
सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले आहे.
First published on: 24-02-2014 at 01:13 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhujbal to contest lok sabha polls from nashik