बिहारच्या खगारिया मतदारसंघात राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि जद(यू)च्या महिला उमेदवारांमध्ये होणाऱ्या लढतीकडे आतापासूनच सर्वाचे लक्ष लागले आहे. बिहारमधील एका स्थानिक वजनदार नेत्याच्या दोन भार्या एकमेकींविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या ‘अंतर्गत’ लढतीबाबात उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक वजनदार नेते रणबीर यादव यांच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या कृष्णा यादव यांना राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी खगारियातून उमेदवारी दिली आहे. तर रणबीर यादव यांच्या पहिल्या पत्नी पूनम देवी यादव या खगारियातील जद(यू)च्या आमदार असून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.
कृष्णा यादव आणि पूनम देवी यादव या सख्ख्या बहिणी आहेत, हे विशेष. दोन्ही सख्ख्या बहिणी एकमेकांविरोधात लढणार असल्या तरी त्यामुळे कोणतेही धर्मसंकट उभे ठाकल्याचा दोघींनी इन्कार केला आहे.

Story img Loader