निवडणूक आयोगाकडून गंगा आरतीला परवानगी नाकारल्याची ओरड करून वाराणसीतील हिंदू मतांचे ध्रूवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आम आदमी पक्षाने गुरुवारी उघड केला. मोदींना निवडणूक आयोगाने गंगा आरतीला परवानगी दिली असल्याचे सांगत ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी ‘ट्विटर’वर यासंदर्भातील निवडणूक आयोगाचे पत्रही जाहीर केले.
‘मोदींना गंगा आरतीसाठी परवानगी मिळाली होती. पण आरती करायचे सोडून ते यातून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असे ट्विटरवरून केजरीवाल यांनी टीकास्त्र सोडले.
धार्मिक कार्यक्रमांसाठी निवडणूक आयोगाची परवानगी लागत नाही, राजकीय कार्यक्रमांसाठी लागते, असेही ते म्हणाले. यासाठी ‘हेतू स्वच्छ असावा लागतो’ असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला.
‘गंगा आरतीला परवानगी असताना मोदींचा कांगावा’
निवडणूक आयोगाकडून गंगा आरतीला परवानगी नाकारल्याची ओरड करून वाराणसीतील हिंदू मतांचे ध्रूवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आम आदमी पक्षाने गुरुवारी उघड केला.
First published on: 09-05-2014 at 12:31 IST
TOPICSनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha Pollsसंसदीय निवडणुकाParliament Election
+ 2 More
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp aap activists clash in varanasi over refusal of narendra modis rally