निवडणूक आयोगाकडून गंगा आरतीला परवानगी नाकारल्याची ओरड करून वाराणसीतील हिंदू मतांचे ध्रूवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आम आदमी पक्षाने गुरुवारी उघड केला. मोदींना निवडणूक आयोगाने गंगा आरतीला परवानगी दिली असल्याचे सांगत ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी ‘ट्विटर’वर यासंदर्भातील निवडणूक आयोगाचे पत्रही जाहीर केले.
‘मोदींना गंगा आरतीसाठी परवानगी मिळाली होती. पण आरती करायचे सोडून ते यातून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असे ट्विटरवरून केजरीवाल यांनी टीकास्त्र सोडले.
धार्मिक कार्यक्रमांसाठी निवडणूक आयोगाची परवानगी लागत नाही, राजकीय कार्यक्रमांसाठी लागते, असेही ते म्हणाले. यासाठी ‘हेतू स्वच्छ असावा लागतो’ असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in