महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याची टिप्पणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. भाजपने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे रविवारी तक्रार केली आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने आचारसंहितेचा भंग केला असून याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करून काँग्रेसची मान्यता काढून घ्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस.  संपत यांनी दिलेल्या निवेदनात भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप केला आहे. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राहुल आणि काँग्रेसच्यावतीने केल्या जाणाऱ्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे धार्मिक तणाव वाढण्याची भीतीही भाजपने व्यक्त केली आहे.

Story img Loader