शिवसेना आमचा विश्वासू सहकारी पक्ष असून भारतीय जनता पक्षाचे(भाजप) कार्यकर्ते महायुतीचाच प्रचार करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज यांच्या मोदी’दुसरा’ने शिवसेना घायाळ, तर..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी मनसेचे खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील असे वक्तव्यकरून शिवसेनेला घायाळ केले होते. त्यात मनसेने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत एक जागा वगळता इतर जागा शिवसेनेच्या विरोधातील आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर महायुतीतल्या शिवसेनेला बगल देत भाजप मनसेला महत्व देत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.
राज यांनी टाकलेल्या ‘राजकीय गुगली’नंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज (मंगळवार) भेट झाली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणतात, आज उद्धवजींची मातोश्रीवर भेट घेतली, शिवसेना आमचा विश्वासू पक्ष आहे आणि भाजप कार्यकर्ते फक्त महायुतीचाच प्रचार करतील. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा