पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा कारभार आणि वाढती महागाई यावर सपाचे नेते आझम खान यांनी शनिवारी जोरदार टीका केली. भाजपच्या राजवटीत पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था पूर्ण खिळखिळी होईल, असे आझम खान म्हणाले.
भाजपला पाच वर्षे सत्तेत राहू दिल्यास देशाची अर्थव्यवस्था डबघाईला जाईल, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवरूनच ते स्पष्ट होत आहे, असेही आझम खान म्हणाले.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे नजीकच्या भविष्यात जनतेला एक किलो कांद्यासाठी १५० रुपये मोजावे लागणार आहेत, या सरकारचा गैरकारभार सरकारने घेतलेल्या निर्णयांवरूनच स्पष्ट होत आहे, असेही ते म्हणाले.