भाजपवाल्यांनी २००४ मध्ये इंडिया शायनिंगचा फुगविलेला फु गा याच जनतेने फोडला. तो हवेचाच होता. आता गुजरात पॅटर्नचा गॅसचा फु गा फु गविण्यात येत आहे. जनता तोही फ ोडल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वास व्यक्त करतानाच काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी या वेळी सत्तेवर आल्यानंतर ७० क ोटी निम्न मध्यमवर्गीयांना मध्यमवर्गीयांच्या श्रेणीत आणण्याचे स्वप्न पूर्ण करू, अशी हमी आजच्या भाषणात दिली. राहुल यांच्या वर्धा आणि चंद्रपूर येथे सभा घेतल्या.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ राहुल गांधी यांनी वध्र्यातील सभेतून फ ोडला. आरटीओ पटांगणावर आयोजित या सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते. तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रचारार्थ वडसा येथील क्रीडांगणावर सभा झाली.
राहुल यांनी संपुआ सरकारच्या विविध योजनांचा पाढा वाचला. गरिबांसाठी असणाऱ्या अनेक योजना विरोधकांनीच हाणून पाडल्याचा आरोप करतानाच आगामी काळात सत्तेवर आल्यानंतर काय करणार, याचेही चित्र रंगविले.
सभेनंतर सुरक्षा रक्षकांना बाजूला सारत ते कठडय़ाभोवती उभ्या महिलांना भेटण्यासाठी सरसावले. महाराष्ट्रात किती जागा येणार, अशी पृच्छा केल्यावर क्षणभर भांबावलेल्या राहुल यांनी, जितक्या लढवित आहोत, त्या सर्व जिंकणार, असे हसत उत्तर दिले.
भाजपला गोरगरिबांचा विसर-राहुल गांधी
भाजपवाल्यांनी २००४ मध्ये इंडिया शायनिंगचा फुगविलेला फु गा याच जनतेने फोडला. तो हवेचाच होता. आता गुजरात पॅटर्नचा गॅसचा फु गा फु गविण्यात येत आहे.
आणखी वाचा
First published on: 29-03-2014 at 04:20 IST
TOPICSभारतीय जनता पार्टीBJPराहुल गांधीRahul GandhiलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp nothing to do with poor rahul gandhi