नरेंद्र मोदींच्या प्रतिज्ञापत्रातील ‘विवाहीत’ नोंदीवरून काँग्रेसकडून सुरू असलेल्या टीकेवर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, जास्त खोलात शिरू नका, नाहीतर गांधी आणि नेहरू परिवाराचे इतिहासातील सर्व पुरावे बाहेर काढू, असा इशारा भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी दिला आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी वडोदरामधून उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात पहिल्यांदाच आपण विवाहीत असल्याचे कबुल केले. यावरून विरोधकांकडून टीकेचा सुर उमटू लागला आहे. काँग्रेस उपाध्यक्षा राहुल गांधी यांनीही याच मुद्द्याला उचलून धरले आणि दोडा येथील प्रचारसभेत स्वत:च्या पत्नीचे नाव लपवणारे देशातील महिलांच्या सुरक्षेबाबत काय प्रयत्न करणार, असा खोचक सवाल उपस्थित केला.

Story img Loader