आर्थिक विकासासाठी सकारात्मक विरोधकांची भूमिका बजावायची सोडून काँग्रेस अडथळे आणत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू यांनी केला. विकास साध्य करण्यासाठी आम्हाला पूर्ण सत्ता गरजेची आहे. त्यासाठी राज्यसभेत भाजप आणि मित्रपक्षांना राज्यसभेत बहुमत मिळवण्याचे आमचे ध्येय आहे. आर्थिक विकास गतीने करण्यासाठी काही विधेयके संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. काँग्रेस मात्र विधेयकांना विलंब कसा होईल याची रणनीती आखत असल्याचा आरोप नायडूंनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा