खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्दात टीका केल्याच्या आरोपावरून बारामती मतदार संघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यावर वेल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील  प्रचारादरम्यान जानकर यांनी सुळे यांच्यावर अश्लील शब्दांत वैयक्तिक पातळीवर टीका केल्याची तक्रार राष्ट्रवादीचे कार्यकत्रे प्रदीप मरळ यांनी केली होती.

Story img Loader