*राज्यात नरेंद्र मोदी यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सभांकडे लोकांनी पाठ फिरविल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची रविवारची मुंबईतील सभा यशस्वी करण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.
*नंदुरबार, धुळे आणि मुंबईत रविवारी सोनिया यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबारशी गांधी घराण्याचे असलेले आपुलकीचे संबंध लक्षात घेता सोनियांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा काँग्रेसला विश्वास आहे.
*मुंबईतील वांद्रे येथील एमएमआरडीए मैेदानात ही सभा आयोजित करण्यात आली असून, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये याच मैदानावर नरेंद्र मोदी यांची मोठी सभा झाली होती. तसेच सोमवारी याच मैदानात मोदी यांची पुन्हा सभा होत आहे. त्यामुळे सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघातून गर्दी जमविण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.