मतदानाचा घटनादत्त अधिकार बजावा असे सगळेच सांगतात. पण मतदान करायचे ते का? कशासाठी? आणि मुख्य म्हणजे कसे? सर्वसामान्य, राजकारणापासून चार हात दूरच राहात असलेल्या आपणांस नेहमीच
राजकारण आणि राजकारणी हे दोन्ही वाईट असून जे काही वाईट घडते त्याला हे राजकारणीच जबाबदार आहेत, अशी आपली एक ठाम समजूत झालेली आहे. त्यातही राजकारणी व नोकरशहा हे एका बाजूला आणि आपण सर्वसामान्य नागरिक एकीकडे अशी वाटणी आपण केलेली आहे पण ती चुकीची आहे. तेव्हा प्रथम राजकारण आणि राजकारणी यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे.
भ्रष्टाचार, महागाई, गरिबी, बेरोजगारी, असे प्रश्न आपल्यासमोर आहेत. पण स्वातंत्र्यानंतर देशात काहीच चांगले घडले नाही? आपल्या आजूबाजूच्या देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरण, तेथे होणारी लोकशाहीची विटंबना याच्या तुलनेत इतकी वर्षे आपण लोकशाही टिकवून ठेवली, विविध क्षेत्रांत प्रगती केली, आपल्या अनेक पिढय़ा इथे सुखेनैव जगत आहेत, हे आपण का विसरतो? यात राजकारणी मंडळींचा काहीच वाटा नाही का? प्रत्येक गोष्ट शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी करावी, असा आग्रह धरणेही चुकीचे आहे. मग भारताचे नागरिक म्हणून आपली काहीच जबाबदारी नाही का? त्यामुळे सर्वप्रथम आपण जबाबदारी पेलायला आणि स्वीकारायला शिकले पाहिजे.
आपल्यासमोर चांगला आणि वाईट असे दोनच पर्याय असतात, तेव्हा निवड सोपी असते. पण वाईट आणि अधिक वाईट असे पर्याय असतात तेव्हा निवड करणे खूप कठीण जाते. पण म्हणून मतदानच न करणे हा उपाय नाही. प्रत्येक नागरिकाने मतदान करून आणि राजकारणात रस घेण्याचे स्वत:ला बजावून त्याची सुरुवात केली पाहिजे. हृदयापेक्षा मेंदूने विचार केला पाहिजे. भावनेच्या आहारी न जाता विचारपूर्वक मतदान केले पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा