सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, मुलगा पंकज आणि खासदार असलेला पुतण्या पंकज यांच्या डझनभर कंपन्यांनी गेले तीन ते आठ वर्षे प्राप्तिकर परतावाच भरलेला नाही. एवढेच नव्हे तर २००९ मध्ये त्यांची २१ कोटी रुपये असलेली संपत्ती २६०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून यासदर्भात सर्व कागदपत्रांसह आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.
भुजबळ कुटुंबीयांच्या इदीन फर्निचर या कंपनीने तर स्थापनेपासून म्हणजे २००६ सालापासून प्राप्तिकर परतावा भरलेला नसून दिल्लीमधील महाराष्ट्र सदनाचे करोडो रुपयांचे कंत्राट याच कंपनीला मिळाल्याचे सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबतच्या पत्रकात पर्वेश कन्स्ट्रक्षन कंपनीने २०१० पासून प्राप्तिकर परतावा भरला नसून कंपनीत कोटय़वधी रुपयांचे बेनामी शेअर्सचा घोटाळा आहे. देविशा इन्फ्रास्ट्रक्टर कंपनीच्या माध्यमातून खारघर प्रकल्पात २५ एकरामध्ये ५०० कोटी रुपयांची मालमत्ता निर्माण केली असून बिल्डरांकडून लाचेतून कोटय़वधी रुपये मिळाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला़  दरम्यान सोमय्यांविरोधात अब्रनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे छनग भुजबळ यांनी सांगितले.

Story img Loader