वसईतील लक्षणिय असलेल्या ख्रिश्चन मतांवर डोळा ठेवून दोन दिवसांपूर्वी आपल्या वसई दौऱ्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बिशप हाऊसमध्ये जाऊन बिशप फेलिक्स मच्याडो यांची भेट घेतली.  वसई आणि नालासोपारा या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये ख्रिश्चन धर्मियांची मते मोठय़ा प्रमाणावर आहेत.  पालघर मतदारसंघात काँग्रेसने राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे.वसईतील ख्रिश्चन धर्मियांच्या दृष्टीने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा पराभव करणे हे उद्दिष्ट आहे. अशा वेळी ठाकूर यांच्या उमेदवाराला कोण लढत देईल हे बघूनच मतदान होण्याची शक्यचा व्यक्त केली जाते.

Story img Loader