उत्तर मध्य- मुंबई मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या विरोधात असलेली गटबाजी किंवा नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पुढाकार घेतला. मुंबईत गतवेळप्रमाणेच यश मिळविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.
उत्तर मध्य- मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या विरोधात नसिम खान आणि कृपाशंकर सिंग सक्रिय झाले नव्हते. या दोन्ही नेत्यांनी प्रिया दत्त आम्हाला विश्वाासात घेत नाहीत, अशी तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वच नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर सर्व नेत्यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करण्याचा निर्धार केला. कृपाशंकर सिंग आणि नसिम खान यांच्याबद्दल नाहक वावडय़ा उठविण्यात येत होत्या. वास्तविक परिस्थिती तशी नव्हती, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांनी सांगितले. २० तारखेला एमएमआरडीए मैदानावर होणारी सोनिया गांधी यांची जाहीर सभा यशस्वी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2014 रोजी प्रकाशित
मुंबईतील गटबाजी टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
उत्तर मध्य- मुंबई मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या विरोधात असलेली गटबाजी किंवा नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पुढाकार घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-04-2014 at 02:39 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm prithviraj chavan takes initiative to avoid lobby in congrss