आपल्या चुरचुरीत विनोदांनी हास्याची कारंजी फुलवणारा विनोदवीर राजू श्रीवास्तव याने त्याची राजकीय कारकीर्दही फारशी गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे त्याला समाजवादी पक्षाची उमेदवारी गमवावी लागली आहे.
मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षाने राजूला कानपुरातून लोकसभा उमेदवारी देऊ केली. त्याच्या नावाची घोषणाही झाली. त्यामुळे त्याने कानपुरात राहून पक्षाचा आणि स्वत:चाही जोरदार प्रचार करणे अपेक्षित होते. मात्र निवडणुकीला अवघा महिना उरलेला असतानाही राजूने मुंबईतच राहणे पसंत केले आहे. मुंबईतील त्याच्या व्यग्र कार्यक्रमांतून वेळ काढून त्याला प्रचारासाठी कानपूरला जायला वेळ नाही. त्यामुळे समाजवादी पक्षाने राजूची अडचण ओळखून त्याला उमेदवारीच्या जोखडातूनच मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Story img Loader