विकासाला केंद्रबिंदू मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी जी पावले टाकत आहेत ती उत्साहवर्धक असून मोदींच्या या नव्या रूपाचे आणि सर्वसमावेशक व सकारात्मक भूमिकेचे स्वागतच केले पाहिजे, अशी भलामण काँग्रेस प्रवक्ते शशी थरूर यांनी केल्याने काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. थरूर यांची ही विधाने म्हणजे त्यांची व्यक्तिगत मते आहेत, असे काँग्रेसतर्फे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. मोदी सरकारने अद्याप कामकाजच सुरू केले नसताना त्यांच्या कार्याचे आकलन करण्यात घाई करून चालणार नाही, असे पक्षप्रवक्त्या शोभा ओझा यांनी सांगितले.  थरूर यांच्यावर कारवाई करणार का, हे सांगण्यासही नकार दिला.

Story img Loader