मुस्लीम समाजाने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन करणारे जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांना घरचा अहेर मिळाला आहे. काँग्रेसने नेहमीच मुस्लिमांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यामुळे इमामांच्या आवाहनाचा मी निषेध करतो, अशा शब्दांत इमाम यांचा लहान भाऊ सय्यद याह्य़ा बुखारी यांनी इमामांवर टीका केली. शनिवारी येथे एका पत्रकार परिषदेत त्यांनी नाराजी व्यक्त केली.  
याह्य़ा बुखारी म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतील गुजरातमध्ये मुस्लिमांच्या बाबतीत १०-१२ वर्षांपूर्वी काय घडले, हे केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर सर्वाना ठाऊक आहे. मात्र, मुस्लिमांचे शिरकाण करण्यात काँग्रेस त्यांच्यापेक्षा दहा पावले पुढे आहे. काँग्रेस राजवटीत जेवढे मुस्लीम मारले गेले तेवढे अन्य कोणत्याही पक्षाच्या राजवटीत मारले गेले नाहीत. भाजप हा मुस्लिमांचा उघड शत्रू आहे, मात्र काँग्रेसने मुस्लिमांवर नेहमीच पाठीमागून हल्ला केला आहे, अशी टीका त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress stabs in back of muslims syed bukhari
Show comments