सोळाव्या लोकसभेच्या निवडणूक निकालांमध्ये धुव्वा उडालेल्या काँग्रेसवर आणखी एक नामुष्की ओढवण्याची चिन्हे आहेत. भारतीय लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी किमान ५५ जागांवर विजय मिळविणे गरजेचे आहे. मात्र, काँग्रेसला केवळ ४४ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याने त्यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे.
जर एखाद्या पक्षास किमान ५५ जागा मिळल्या नाहीत तर विरोधी पक्षनेतेपद हे एका पक्षाकडे राहत नाही. तर विरोधी बाकांवर बसलेल्या प्रत्येक पक्षाचे नेते हे ‘आपापल्या’ पक्षापुरते विरोधी पक्षनेते म्हणून वावरतात. मात्र त्यांच्यापैकी एकालाही विरोधी पक्षनेतेपदाचे लाभ, सुविधा, मानधन, भत्ते मिळू शकत नाहीत.
फटका सर्वच नेमणुका करताना..
विरोधी पक्षनेता ही व्यक्ती अनेक महत्त्वाच्या निवडसमित्यांवर पदसिद्ध सदस्य असते. मात्र जर एकच एक विरोधी पक्ष नसेल तर या सगळ्याच नेमणुका करताना पेचप्रसंग उद्भवेल.
दरम्यान लोकसभेच्या सोयीसाठी तसेच या समस्या उद्भवू नयेत म्हणून राहुल गांधी यांच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद सोपविले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा