काँग्रेस विरोधातील वादळ तीव्र आहे. या सुनामीत काँग्रेसचा निभाव लागणे अशक्य असल्याचे भाकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी वर्तवले आहे. काँग्रेस त्याच्या ‘पापा’मुळे पराभूत होणार असल्याचे मोदींनी जाहीर सभेत सांगितले.
लोकांच्या समस्येच्या मुळाशी काँग्रेस आहे हे आता जनतेच्या लक्षात आले. विख्यात कायदेतज्ज्ञ फली नरिमन यांनी लोकपाल शोध समितीत भाग घेण्यास नकार दिल्याचा संदर्भ देत, यातून काँग्रेसच्या राजकारणाचे अंतरंग उघड होत असल्याचे सांगितले.
तेलंगणामध्ये काँग्रेसची फूट पाडा आणि राज्य करा ही नीती उघड झाल्याचा आरोप केला. लोकांची भांडणे लावून काँग्रेसवाले गंमत बघत बसतात, अशी टीका मोदींनी केली. अनेकांच्या त्यागामुळे तेलंगणची निर्मिती झाली काँग्रेसमुळे नव्हे असा टोला मोदींनी लगावला.

Story img Loader