उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा हे भ्रष्टाचार आणि जातीयवाद यांच्या मिश्रणाचे घातक रसायन असल्याची टीका माकपने केली आहे. सदर दोन्ही नेत्यांना पक्षात पुनप्र्रवेश देऊन भाजपने भविष्यातील भारत कसा असेल, याची चुणूक दाखविली आहे, अशी टीका माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी ट्विटरवर केली आहे. कल्याणसिंह आणि येडियुरप्पा यांना भाजपमध्ये पुनप्र्रवेश देण्यात आला आहे. गेल्या रविवारी कल्याणसिंह स्वगृही परतले तर गेल्या जानेवारी महिन्यांत येडियुरप्पा स्वगृही परतले.

Story img Loader