केंद्रात भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर आली त्याचे श्रेय कोण्या एका व्यक्तीचे नसून जनतेचे आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.लोकांना बदल हवा होता. त्यामुळे यशाचे श्रेय एखादी व्यक्ती आणि राजकीय पक्षापेक्षा जनतेचे आहे, असे भागवत यांनी कोणाचाही उल्लेख न करता सांगितले. शनिवारी भाजपच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा उल्लेख सामनावीर असा केला होता. त्यामुळे भागवत यांचे हे मत महत्त्वपूर्ण आहे. काही जण व्यक्ती किंवा पक्षाला श्रेय देतात पण लोकांनी जेव्हा निश्चय केला तेव्हाच बदल झाला, असे भागवत यांनी सांगितले. सुरक्षा आणि विकासाची जबाबदारी केवळ सरकारचीच आहे असे कुणी मानू नये, जनतेचाही सहभाग त्यामध्ये गरजेचा आहे कारण तेच मालक आहेत, असे भागवत यांनी स्पष्ट केले.