निवडणुकीत मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी नामसाधम्र्य असलेले एकापेक्षा अधिक उमेदवार उभे करण्याचा प्रयोग नवीन नाही. पण एकाच नावाच्या दोन उमेदवारांचे निवडणूक चिन्हही जवळपास सारखेच असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराची पंचाईत होणार आहे. मावळमध्ये श्रीरंग बारणे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर आणखी एक श्रीरंग बारणे नावाचे उमेदवार जनता दल युनायटेडच्या वतीने रिंगणात आहेत. शिवसेनेच्या बारणे यांचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण असताना जनता दल (यू)चे चिन्ह नुसता बाण आहे. यातून मतदारांचा निश्चितच गोंधळ होऊ शकतो. शिवसेनेचे बारणे यांना शह देण्याकरिता पद्धतशीरपणे ही खेळी करण्यात आली आहे. कारण जनता दल (यू) चे चिन्ह बाण असल्याने दुसऱ्या श्रीरंग बारणे यांच्यासाठी या पक्षाची उमेदवार मिळविण्यात आली. राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारून शेकापच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप लढत आहेत. लक्ष्मण जगताप या नावाचे दोन अपक्ष रिंगणात आहेत. म्हणजेच बारणे आणि जगताप या दोन्ही मुख्य उमेदवारांची काहीशी पंचाईतच झाली आहे. विजयश्री मिळविण्यासाठी अनेक क्लृप्त्या लढविल्या जातात, ही त्यातलीच तर नाही ना, असे काही ठिकाणी चर्चा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा